Silvina Luna Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Silvina Luna Passed Away: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला प्लॅस्टिक सर्जरी करणं जीवावर बेतलंl; एका निर्णयाने सगळंच संपलं

Silvina Luna Dies: अर्जेंटिनाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लुना हिचं निधन झालं आहे.

Chetan Bodke

Silvina Luna Passed Away

हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लुना हिचं निधन झालं आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्लॅस्टिक सर्जरी दरम्यान सिल्विनाला तिचा जीव गमवावा लागला आहे. सिल्विना लुनाबद्दल बोलायचे तर, पेशाने ती टेलिव्हिजन अँकर असून रिॲलिटी टेलिव्हिजन स्टार देखील आहे.

अभिनेत्रीचे ३१ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले असून मीडिया रिपोर्ट्सनुसार लुनाला प्लॅस्टिक सर्जरीमुळे तिला किडनीचा आजार उद्भवला होता. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, सिल्विना लुना गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. (Hollywood)

प्लास्टिक सर्जरीमुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या गुंतागुंतीशी दीर्घकाळ लढाई केल्यानंतर तिचे निधन झाले आहे. ४३ वर्षीय अभिनेत्री सिल्विना लुनाची प्लॅस्टिक सर्जरीमुळे २०११ पासून किडनी निकामी झाली होती. (Actress)

वकील फर्नांडो बरलांडो यांनी अभिनेत्रीच्या निधनाची बातमी दिली आहे. फर्नांडो बरलांडो म्हणाले, डॉक्टरांनी तिला पुन्हा एकदा लाइफ सपोर्टवर ठेवावे लागेल, असे सांगितल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला लाइफ सपोर्टपासून डिस्कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता गुस्तावो कॉन्टीने अभिनेत्रीच्या निधनाविषयी वृत्त देताना सांगितले, "आम्ही नेहमीच तुमच्यावर प्रेम केले आहे, आणि तुमच्यावर प्रेम करू, आम्ही त्याच मार्गावर चाललो आहोत, तुम्ही नेहमी माझ्या हृदयात आहेत. तुम्ही माझ्या निवडलेल्या कुटुंबापैकी एक आहात." ब्युनोस आयर्स टाइम्सच्या वृत्तानुसार, सिल्विनाचा इतक्या लहान वयात झालेला मृत्यू धक्कादायक आहे. ती अनेक वर्षांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होती. कॉस्मेटिक सर्जरी केल्यापासूनच तिला किडनी संदर्भात आजार उद्भवू लागला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT