Girija Oak Saam Tv
मनोरंजन बातम्या

Girija Oak: 'तू ठीक आहेस ना..?' मराठी अभिनेत्रीने दिला इंटीमेट सीन, म्हणाली- 'त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅन...'

Girija Oak: मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सध्या मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. लवकरच तिची ‘थेरपी शेरेपी’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Girija Oak: मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सध्या मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. लवकरच तिची  ‘थेरपी शेरेपी’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये गिरिजा ओक गोडबोलेसह गुलशन देवैया आणि नेहा धूपिया मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री गिरिजा ओक या वेब सिरीजमध्ये एक इंटीमेट सीन दिला असून तिने या सीनबद्दल एका मुलाखतीत तिचं मत व्यक्त केलं.

या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स करायला काहीच हरकत नाही

अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले लवकरच " ‘थेरपी शेरेपी’ " या वेब सिरीजमध्ये अभिनेता गुलशन देवैयासोबत दिसणार आहे. या चित्रपटात दोघांनी इंटिमेट सीन्स केले आहेत आणि गिरिजाने सीन्स दरम्यानचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. तिने गुलशनचे कौतुक करताना म्हटले की तो असा अभिनेता होता ज्याच्यासोबत इंटिमेट सीन्स करायला तिला कोणतीही अडचण आली नाही आणि त्याने मला खूप संभाळून घेतले होते.

तू ठीक आहेस ना?

अभिनेत्री म्हणाली, "तुम्ही कितीही तयारी केली तरी, असे फार कमी लोक असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला थोडेसेही अनकंफर्टेबल वाटत नाही आणि गुलशन त्यापैकी एक आहे." अभिनेत्री पुढे म्हणाली, "त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन ते चार उशा आणल्या: एक लहान, एक मोठी, एक मऊ आणि एक थोडीशी कडक, आणि मला सर्वात चांगली वाटणारी उशी निवडण्यास सांगितले. शूटिंग दरम्यान, त्याने मला सुमारे १६-१७ वेळा विचारले, 'तू ठीक आहेस ना?'"

"दुसऱ्या कोणासोबत..."

गिरिजा ओक पुढे म्हणाली की जेव्हा एखाद्या सीनदरम्यान उशीमुळे तिला अनकंफर्टेबल वाटायचं, तेव्हा गुलशन म्हणायचा,"जर तुम्हाला हवे असेल तर आपण काढू शकतो. मला काही अडचण नाही." "त्या हावभावामुळे मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटला. इतर कोणासोबतही हा सीन करणे कठीण झाले असते, परंतु गुलशनसोबत मी पूर्णपणे कंफर्टेबल होते. आणि आता मी त्याबद्दल उघडपणे बोलू शकते कारण त्याने मला कंफर्टेबल करण्यात खूप मदत केली. "

गिरिजा ओक गोडबोले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘तारे जमीन पर’ (2007), ‘जवान’ (2023) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आगामी वेब सीरीज ‘थेरपी शेरेपी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही सिरिज मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधांमधील अडचणींवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

SCROLL FOR NEXT