Archana Puran Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Archana Puran Singh : कॉमेडी क्वीन अर्चना पूरन सिंहला गंभीर दुखापत; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, सेटवर नेमकं काय घडलं?

Archana Puran Singh Injured : अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन अर्चना पूरन सिंहला शूटिंगच्या सेटवर मोठी दुखापत झाली आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. मात्र आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अर्चना पूरन सिंहचा मोठा अपघात झाला आहे. शूटिंगच्या सेटवर अर्चना गंभीर जखमी झाली आहे. तिने याबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना बातमी दिली आहे.

अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्या हाताला दुखापत झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अर्चना पडली आणि तिच्या हाताला फॅक्चर झाला आहे.अर्चना पूरन सिंह राजकुमार राव सोबत फिल्मचे शूट करत होती, तेव्हा ही घटना घडली. व्हिडीओमध्ये सेटवर अर्चना वेदनेने ओरडताना पाहायला मिळत आहे. मोठ्या दुखापतीपासून अर्चना पूरन सिंह वाचल्या आहेत.

अर्चना व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, "जो होता है अच्छे के लिए होता है... मी यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी ठीक आहे. खरंच.. नेहमीप्रमाणेच सकारात्मक आहे. फक्त एका हाताने काम करताना किती त्रास होतो आणि अडचणी येतात हे आता मला समजत आहे." अर्चनाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून चिंता आणि काळजी व्यक्त केली जात आहे.

अर्चना पूरन सिंहने आपल्या दुखापती बद्दल सर्व माहिती तिच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये सांगितली आहे. दुखापतीनंतर अर्चनाने राजकुमार राव कॉल करून प्रोडक्शनमध्ये उशीर होत असल्याने त्याची माफी मागितली आहे. तसेच लवकर बरी होऊन कामावर येऊन असे अर्चना बोली आहे. लवकरच बरी होऊन अर्चना शूटिंगला परतणार आहे. तसेच राजकुमार रावचा आगामी चित्रपट कोणता याचा अद्याप खुलासा झाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT