AR Rahman reacts to Gandhi Godse Ek Yudh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gandhi Godse Ek Yudh Controversy: 'गांधी गोडसे एक युद्ध' वादावर एआर रेहमान यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'निर्मात्यांवर विश्वास नाही...'

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटावर संगीतकार एआर रेहमान मत व्यक्त आहे आहे.

Pooja Dange

AR Rahman reacts to Gandhi Godse Ek Yudh Controversy: राजकुमार संतोषी दिग्दर्शगोडसे एक युद्ध' हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे भेटले असते तर काय झाले असते, हे दाखविण्यात आले आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता.

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा कथितपणे गौरव केल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला होता. आता एआर रेहमानने या प्रकरणावर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची बाजू घेत आपले मत व्यक्त केले आहे.

एआर रेहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लोकांनी हा चित्रपट पाहिला नाही आणि ट्रेलर एकतर्फी असल्याचे आधीच समज करून घेतला आहे. चित्रपट निर्माते केवळ एकतर्फी चित्रपट बनवतात, असे लोकांना वाटते. म्हणून लोकांनी चित्रपट निर्मात्यांवर विश्वास ठेवणे बंद केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने या चित्रपटाचे दिग्दर्शकही या द्वेषाला बळी पडत आहेत.

'गांधी गोडसे एक युद्ध'चे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी नुकतेच मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी लिहिले आहे की, काही लोकांकडून मला धमकावले जात आहे. तसेच चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यानही राजकुमार संतोषीला विरोधाचा सामना करावा लागला होता. पत्रकार परिषदेला पोहोचलेल्या लोकांनी काळे झेंडे दाखवत गांधी अमर रहेच्या घोषणा दिल्या.

राजकुमार संतोषी 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाद्वारे नऊ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतले आहेत. या चित्रपटातून राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी आणि दीपक अंतानी डेब्यू करत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकरही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे.

याशिवाय पुढील वर्षी राजकुमार संतोषी, सनी देओलसोबत भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित 'लाहोर: 1947' हा चित्रपटात घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT