Appi Amachi Collector In Appi Became A Collector Instagram
मनोरंजन बातम्या

Appi Amchi Collector: भ्रष्टाचाराचा नायनाट करणारी अप्पी अखेर कलेक्टर झालीच; असा रंगणार महाएपिसोड...

अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे, आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात आलं.

Chetan Bodke

Appi Amachi Collector In Appi Became A Collector: झी मराठी वरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने सध्या सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घातला आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, मालिकेत ग्रामीण गावात राहणाऱ्या या मुलीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.

या संघर्षात तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आपण पाहिलं. ही मालिका आता चर्चेचं विषय होतेय आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी ठरत आहे, कारण अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे, आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात आलं.

सासरी राहणारी अप्पी संसार आणि शिक्षण ही तारेवरची कसरत सांभाळत आपलं स्वप्न उराशी बाळगत ते पुर्ण केलं. समोर आलेल्या संकटाला दोन हात करत, शेवटच्या क्षणी वडील मृत्यूच्या दारात असताना न डगमगत परीक्षेला जावे लागले पण अप्पी मागे हटली नाही. पण आता मालिका खरी उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ११ आणि १२ एप्रिलला ज्येष्ठ वकिल उज्वल निकम आणि लेखक सोबतच आयएएस ऑफिसर विश्वास पाटील यांनी अप्पीची मुलाखत घेतली. (Latest Marathi News)

या मालिकेच्या माध्यमातून तरी का होईना, या दोघांनाही टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच रियल लाईफमधली भूमिका मालिकेत साकारताना दिसले. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर होत आहे. त्यामध्ये येत्या रविवारी महाएपिसोडमध्ये अर्जुन, छकुली, दिप्या आणि सर्व गावकरी मिळून अप्पीची मिरवणूक काढणार आहेत.हा सोहळाच मोठ्या धुमधडाक्यात गावात पार पडणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी अप्पीला त्रास दिला ते सरकार आणि सुजय देखील तिचे कौतुक करताना दिसणार आहे. (Latest Entertainment News)

अत्यंत प्रामाणिक आणि साधी असलेल्या अप्पीने कलेक्टर झाल्यानंतर संसार, घरातल्यांची जबाबदारी आणि नोकरी कशा प्रकारे सांभाळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भ्रष्टाचाराला नेहमीच कडाडून विरोध करणाऱ्या अप्पीला तिचा नवरा भ्रष्टाचार करतोय हे पाहून हे पाहून तिची अवस्था काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ती त्याला माफ करेल का अशी बरीच आव्हानं अप्पीच्या वाट्याला येणार आहेत. (Marathi TV Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amalner Accident : रस्त्यात गाय आली अन् अनर्थ घडला; दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात, महिलेचा मृत्यू

Maharashtra Dasara Melava Live Update: दसरा मेळाव्यासाठी पालघर मधून शिवसैनिक रवाना

Dombivli Investment Scam: डोंबिवलीतील ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ घोटाळा उघड; शंभराहून अधिक गुंतवणूकदारांची 5,00,00,000 फसवणूक|VIDEO

Manoj Jarange: ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के मदत करा, जरांगेंच्या ४ मागण्या

Cancer: कॅन्सरची ही लक्षणं शरीरात लपलेली असतात

SCROLL FOR NEXT