Anushka Sharma Quit Acting Field Instagram
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Quit Acting: दुसऱ्या बाळाच्या चर्चेनंतर अनुष्का शर्माच्या 'त्या' मुलाखतीचा VIDEO व्हायरल, अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेणार?

Anushka Sharma News: अनुष्का दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर फिल्मइंडस्ट्रीतून पुन्हा एकदा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

Chetan Bodke

Anushka Sharma Quit Acting Field

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हे दुसऱ्यांदा आई- बाबा होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होते. काही पापाराझींनी दोघांनाही मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर एकत्र स्पॉट केले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होतेय. सोबतच, अनुष्का दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर फिल्मइंडस्ट्रीतून पुन्हा एकदा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि विराट हे दोघेही लवकरच चाहत्यांना बाळाची गुड न्यूज देणार आहेत. सध्या तरी याबातमीवर अनुष्का आणि विराट हे दोघेही शांत आहेत. विरुष्काला एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे. अनेकदा त्या दोघांनीही आपल्या चाहत्यांसोबत वामिकाचे फोटो शेअर केलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराटला पापाराझींनी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर एकत्र स्पॉट केले होते, परंतु दोघांनीही त्यांना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती.

याबाबत लवकरच जाहीर करु, असे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे अनुष्का बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही कार्यक्रमामध्ये स्पॉट झालेली नाही. त्यासोबतच मध्यंतरी झालेल्या अनेक पार्ट्यांमध्येही ही जोडी दिसून आली नाही.

दरम्यान, अभिनेत्रीची सोशल मीडियावर एक जुनी मुलाखत प्रचंड व्हायरल होत आहे. एका चॅट शोमध्ये तिने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अनुष्का म्हणते, “माझ्या आयुष्यामध्ये लग्नासाठी महत्वाचं स्थान आहे. मला मुलं झाल्यानंतर मी कदाचित माझ्या कामातून ब्रेक घेईल.” अभिनेत्रीने केलेलं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर कमालीचं चर्चेत आलं आहे.

आनंद राय दिग्दर्शित ‘झीरो’मध्ये अभिनेत्री अखेरची दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. २०२१ मध्ये वामिकाचा जन्म झाल्यानंतर ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटातून फार मोठ्या ब्रेकनंतर अनुष्का प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची शुटिंग संपली आहे. अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. पुन्हा एकदा अभिनेत्री सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार या चर्चा सुरु झाल्यामुळे चाहते बरेच नाराज झाले आहेत. अद्याप याविषयी अभिनेत्रीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT