Anupamaa Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rupali Ganguli: 'अनुपमा'च्या आयुष्यात पुन्हा येणार आनंद?, रुपाली गांगुलीच्या फोटोवरून होतेय चर्चा

Anupamaa Serial: रुपाली गांगुलीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक बीटीएस बुमरेंग शेअर केला आहे. या बुमरेंग व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली लहान मुलांसोबत झोपलेली दिसत आहे. हे सर्वजण रुपालीसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.

Priya More

Rupali Ganguli Serial:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'अनुपमा' (Anupamaa Serial) सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विट्स येत आहेत. अनुपमाची ही स्टोरी सर्वांना प्रचंड आवडत आहे. अशामध्ये या मालिकेमध्ये पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. अशातच 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल होत असून मालिकेमध्ये नवा ट्विस्ट येणार असल्याबाबत आता जोरदार चर्चा होत आहे.

रुपाली गांगुलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली खूपच आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते अंदाज लावत आहेत की, येणाऱ्या एपिसोडमध्ये अनुपमाच्या आयुष्यामध्ये पुन्हा आनंद येणार आहे? पण हे खरंच आहे की नाही हे येणाऱ्या एपिसोमध्येच पाहायला मिळलेल.

रुपाली गांगुलीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक बीटीएस बुमरेंग शेअर केला आहे. या बुमरेंग व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली लहान मुलांसोबत झोपलेली दिसत आहे. हे सर्वजण रुपालीसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. आता या बुमरेंग व्हिडीओवरूनच अनुपमा मालिकेबाबत म्हटले जात आहे की या मालिकेमध्ये आता नवा ट्विस्ट येणार आहे. सर्वजण म्हणत आहेत की, आता अनुपमामध्ये नेमका काय ट्विस्ट येणार आहे.

एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर रुपाली गांगुलीने शेअर केलेल्या बुमरेंगचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, निर्मात्यांना अनु, अंश आणि इतर मुलांच्यासोबत एक भावनिक रीयूनियन दाखावले आहे ज्यामध्ये परी देखील दिसत आह.

X वर चित्र शेअर करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'मेकर्सनी अनु आणि अंशचे इतर मुलांसोबत भावनिक पुनर्मिलन दाखवावे ज्यामध्ये परी देखील उपस्थित असावी. आम्ही सर्वजण रीयूनियनची आतुरतेने वाट पाहत आहोत.' दुसऱ्या युजरने लिहिले की, रुपाली गांगुली आणि तिच्या चिल्लर पार्टीची ही आजची सर्वात क्यूट स्टोरी आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, 'ही सर्वात गोंडस गोष्ट आहे जी लीपनंतर समोर येणार आहे.'

आता हा फोटो समोर आल्यानंतर काही यूजर्स असा अंदाजही लावत आहेत की, कदाचित अनुपमाच्या आयुष्यात पुन्हा आनंद येणार आहे? अनुपमाला तिचे संपूर्ण कुटुंब परत मिळेल का? आता असे होते की नाही. या मालिकेचा पुढचा एपिसोड रिलीज झाल्यानंतरच कळेल. या मालिकेत नवीन काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News :एसटी बसची दुचाकींना धडक, अपघातात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघेजण जखमी

Mobile Care Tips : फोन पावसात भिजून बंद पडला? 'या' घरगुती टिप्स एकदा ट्राय कराच, खर्चही वाचेल

Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या सभेत राडा; शोमिका महाडिक आक्रमक,पाहा VIDEO

Dombivali Crime : पुण्यात दुचाकी चोरी करून डोंबिवलीत चैन स्नॅचिंग; तीन सराईत चोरटे ताब्यात

SCROLL FOR NEXT