Prakash Raj-Anupam Kher On The Kashmir Files: अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारे प्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेते प्रकाश राज राजकारणात देखील सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर टीका केली आहे आणि नॉनसेन्स चित्रपट असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, या चित्रपटात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्यासोबत अनुपम यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपट त्याच्या कथेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अजूनही या चित्रपटावरून वाद सुरू आहेत.
नवभारत टाइम्सशी झालेल्या मुलाखतीदरम्यान, अनुपम खेर यांनी द काश्मीर फाईलवरील व्यक्तव्यावर प्रकाश राजवर अप्रत्यक्षपणे टीका केली. अनुपम खेर म्हणले, प्रत्येकजण आपापल्या पात्रतेनुसार बोलतो. काही लोकांना आयुष्यभर खोटं बोलावं लागतं, तर काही लोकांना आयुष्यभर खरंच बोलावं लागतं. मी अशा लोकांपैकी एक आहे ज्यांनी आयुष्यभर सत्य बोलून आयुष्य जगले आहे. ज्याला खोटं बोलून जगावं लागतं, ती त्यांची मर्जी.
यापूर्वी, प्रकाश राज यांनी म्हटले होते की, द काश्मीर फाइल्स ही एक ‘प्रोपगंडा फिल्म’ आहे. केरळमधील एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले, “द काश्मीर फाइल्स हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, त्याची निर्मिती कोणी केली हे आम्हाला माहीत आहे. निर्लज्ज. आंतरराष्ट्रीय ज्युरी या चित्रपटावर थुंकतात. ते त्याहून निर्लज्ज आहेत. दुसरा सहकारी दिग्दर्शक अजूनही सांगत आहे, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’ त्याला भास्करही मिळणार नाही.
“मी तुम्हाला सांगतो कारण तिथे एक संवेदनशील माध्यम आहे. येथे तुम्ही प्रोपगंडा फिल्म करू शकता. मला माहीत आहे, माझ्या सूत्रांनुसार, त्यांनी सुमारे 2000 कोटींची गुंतवणूक फक्त असे चित्रपट बनवण्यासाठी केली आहे. पण तुम्ही सतत लोकांना मूर्ख बनवू शकत नाही,” असे प्रकाश राज म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.