vicky jain and anikta lokhande Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 final: बिग बॉसच्या सेटवर अंकिता आणि विकीची एन्ट्री; फिनालेमध्ये मिळणार मोठं सरप्राईज!

Bigg Boss 18 final: बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले आज होणार आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक अंकिता लोखंडे आणि विकी जैन सेटवर दिसले.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 18 final: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले आज होणार आहे. अंतिम स्पर्धक आहेत - विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, करण वीर मेहरा, ईशा सिंग आणि चुम दरंग. फिनालेपूर्वी, बिग बॉसची माजी स्पर्धक अंकिता लोखंडे आणि विकी जैन सेटवर दिसले. आज होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये हे दोघे सहभागी होण्याची शक्यता आहे.

फिल्मीज्ञानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अंकिता लोखंडे नारंगी कुर्ता आणि पायजमा परिधान केलेली दिसते. तिने टॉवेलने तिचे केस झाकले आहेत. तर विकी जैन पॅप्ससमोर हसताना दिसत आहे. तिने पण अंकिताने यावेळी पोज देण्याचे टाळले. यापूर्वी, मन्नारा चोप्राने अंदाज लावला की विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात फायनल होईल. तसेच तिने करणवीरचे कौतुकही केले आहे.

मन्नारा म्हणाली, “मला वाटते की या भागात ज्या व्यक्तीने सगळ्यात जास्त इंटरटेन केलं तो करणवीर आहे.” पण मला वाटतं शेवटी विवान आणि रजत यांच्यात कठीण स्पर्धा होणार आहे. तर बघुयात या भागाचा विनर कोण होणार आहे.

बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले एपिसोड दरम्यान विवियन डिसेना आणि रजत दलाल हे 'मैं हूं डॉन' या गाण्यावर थिरकताना दिसतील. विजेत्याला मिळणारे रोख बक्षीस गेल्या सीझनप्रमाणेच तब्बल ₹५० लाख असणार आहे. मागील भागात मुनावर फारुकी विजेता झाला होता.

वृत्तानुसार, अंतिम एपिसोड दरम्यान बिग बॉस १८ च्या घरातून बाहेर पडणारी ईशा सिंग पहिली असेल. एल्विश यादव मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बिग बॉस १८ च्या अंतिम सेटवर पोहोचला आहे. तो रजत दलालला पाठिंबा देत आहे. करण वीर मेहराच्या टीमने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या बिग बॉस १८ च्या प्रवासाचा दाखवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT