Ankita Lokhande  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande : मालदीव बीच अन् बेभान मन; अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी सुंदर डान्स, पाहा VIDEO

Ankita Lokhande Video: अंकिता लोखंडे सध्या मालदीव ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा समुद्रकिनारी डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती आपल्या नवऱ्यासोबत सुट्टीत एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या तिचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे बेभान होऊन समुद्रकिनारी नाचताना दिसत आहे.

अंकिता लोखंडे सध्या तिची मालदीव ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहे. ती आपल्या ट्रिपचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तिने अलिकडेच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे मालदीवच्या बीचवर 'मेरे रंग में रंगने वाली' या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 'मेरे रंग में रंगने वाली' हे गाणे 'मैने प्यार किया' या चित्रपटातील आहे.

'मैने प्यार किया' चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन ही जोडी पाहायला मिळाली. अंकिता लोखंडेच्या या व्हिडीओनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तसचे मोकळे केस, मिनिमल ज्वेलरी आणि मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला आहे.

अंकिता लोखंडेने या डान्स व्हिडीओला खूप हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "लाटांच्या तालावर नाचणारा एक आत्मा, जिथे प्रत्येक पाऊल स्वातंत्र्य आणि शांतीचा आवाज करतं..." तिच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. डान्समधील तिचे हावभाव तिच्या मनाचा आनंद सांगून जात आहेत. ती मनसोक्त बीचवर डान्स करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT