Instagram
मनोरंजन बातम्या

Ankit Tiwari Concert: आधी खेचल्या झिंज्या, नंतर एकमेकांवर पाडला चापटांचा पाऊस; गायक अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमध्ये तरुणींची मारामारी

Female Fight Video: अंकित तिवारीच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.

Pooja Dange

Ankita Tiwari Show Viral Video:

सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाला राडे होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गायक आणीत तिवारीच्या कार्यक्रमात राडा झाला आहे. बिहारमधील कटिहार येथे अंकित तिवारीचा शो होता. दरम्यान कार्यक्रमावेळी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी झाली.

'दिल चीज तुझे दे दी', 'तेरी गलियां', 'सुन रहा है' अशा अनेक अप्रतिम गाण्यांनी अंकित तिवारीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अंकित तिवारी नुकताच बिहारमध्ये एका कार्यक्रमासाठी गेला होता. अंकित तिवारीला येथे भव्य कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टमधील अंकिताच्या गाण्याची नाहीतर तर दोन मुलींची चर्चा आहे.

अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ विरल भयानी या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली भांडण करताना दिसत आहेत. या दोन मुलींना भांडताना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये त्या दोन मुलींमध्ये खूप भांडण होत्या. त्यानंतर त्यांची हमारी सुरु झाली. या मुलीं एकमेकींचे केस ओढू लागल्या. तसेच एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या मुलींची ही फ्रीस्टायल हाणामारी पाहून गायक अंकित तिवारी देखील आश्चर्यचकित झाला असे सांगण्यात येत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट करू लागले आहेत. 'जर तुम्ही अभ्यासावर इतके लक्ष दिले असते तर आज तुम्हाला व्हायरल व्हावे लागले नसते.' 'पापांच्या परीचा कटिहारला अभिमान वाटतोय.' 'महिला सक्षमीकरण' अशा केमेन्ट नेटकरी या व्हिडीओवर करत आहेत.

अंकित तिवारीचा हा पहिला सेलेब्रिटी नाही ज्याच्या कॉन्सर्टने असा गदारोळ झाला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.

याप्रकरणी सोनू निगमने मध्यरात्री चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या घटनेनंतर सोनू निगम म्हणाला होता, 'कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली येत होतो, त्याचवेळी स्वप्नील प्रकाश फातर्पेकर या व्यक्तीने मला पकडले, त्याने मला वाचवण्यासाठी आलेल्या हरी आणि रब्बानी यांना धक्काबुक्की केली. मग मी पायऱ्यांवर पडलो.'

फक्त सोनू निगम आणि अंकित तिवारीच नाही तर हॉलिवूड सेलिब्रेटींच्या कार्यक्रमात देखील असे अनेक प्रकार होतात. या वर्षी जुलैमध्ये, गायिका कार्डी बी एक कार्यक्रम करत होती. कॉन्सर्ट दरम्यान कोणीतरी कोल्ड ड्रिंक तिच्यावर फेकले. कार्डी बीने लगेचच प्रत्युत्तर देत तिच्या हातातला माईक फॅनवर फेकला होता.

तसेच प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनास त्याच्या शोमध्ये देखील असे घडले होते. शो पाहायला आलेल्या प्रेक्षकांपैकी एकीने निक जोनासच्या अंगावर अंतर्वस्त्रे फेकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT