Chhota Bheem And The Curse Of Damyaan Teaser Out You Tube
मनोरंजन बातम्या

Chhota Bheem Teaser: छोटा भीम रुपेरी पडद्यावर, अमुपम खेर यांच्यासह सिनेमात झळकणार अनेक सेलिब्रिटी

Chhota Bheem And The Curse Of Damyaan: कार्टून क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा छोटा भीम लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर सुद्धा पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Chhota Bheem And The Curse Of Damyaan Teaser Out

ॲनिमेटेड छोटा भीम हे कार्टून आजही प्रेक्षकांमध्ये फेमस आहे. आपल्या बालपणात हे नाटक पाहिलं नाही, अशी व्यक्ती मिळणं ही कठीण आहे. छोटा भीम, राजु, जग्गु बंदर, चुटकी. कालिया, ढोलू आणि भोलू हे पात्र कदाचित तुम्हाला आठवत असतील. या कार्यक्रमातील आज असे अनेक पात्रं आहेत, त्यांची चर्चा कायमच सोशल मीडियावर होत असते. कार्टून क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा छोटा भीम लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर सुद्धा पाहायला मिळणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

राजीव चिलाका दिग्दर्शित चित्रपटामध्ये, प्रेक्षकांना छोटा भीमचं एक वेगळं रुप पाहायला मिळणार आहे. धमाकेदार ॲक्शन आणि जबरदस्त कथा असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे दिसून येत आहे. ‘छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्यान’ हा ॲनिमेटेड चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या लाइव्ह-ॲक्शन आवृत्तीची घोषणा केली आहे.

टीझरची सुरुवातच सर्वांचा आवडता छोटा भीमच्या दमदार ॲक्शनने होते. या अ‍ॅक्शनपटामध्ये अनुपम खेर गुरु शंभूच्या भूमिकेत, मकरंद देशपांडे स्कंधीच्या भूमिकेत, तर यज्ञ भसीन छोटा भीमच्या भूमिकेत दिसत आहे. टीझरमध्ये छोटा भीमने गुरु शंभूच्या मदतीने त्याच्या सर्व शत्रूंसोबत दोन हात करताना दिसून येत आहे. भीमचे अनेक ॲक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.

चित्रपटातील इतर पात्रांबद्दल सांगायचे तर, कालियाचे पात्र कबीर साजिद, राजूचे एडविक जैस्वाल, ढोलू आणि भोलूचे पात्र दिव्यम आणि दैविक, स्वर्ण पांडे इंदुमतीच्या भूमिकेत तर संजय बिश्नोई राजा इंद्रवर्माच्या भूमिकेत दिसत आहेत. सोबतच आश्रय मिश्रा-चुटकीचे पात्र तर सुरभी तिवारीने टुनटुन मावशीचे पात्र साकारलेय. (Bollywood Film)

राजीव चिल्का यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ॲनिमेटेड चित्रपटाचेही त्यांनीच दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी दिग्दर्शनासोबतच चित्रपटाची कथाही लिहिली आहे. राघव सच्चर यांनी चित्रपटाला संगीत दिले असून चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट जुनेद उल्लाह यांनी तयार केले आहेत. ग्रीन गोल्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. चित्रपट पुढच्या वर्षी मे २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT