Happy Birthday Ayushmann Khurrana: लग्नात गाणी गाऊन कमावले पैसे, 'या' चित्रपटानं बदललं आयुष्यमानचं आयुष्य; आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

Ayushmann Khurrana Birthday: राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज ३८ वा वाढदिवस.
Ayushmann Khurrana Birthday
Ayushmann Khurrana BirthdaySaam Tv

Happy Birthday Ayushmann Khurrana

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज ३८ वा वाढदिवस. आपल्या स्वत:च्या हिंमतीवर आयुष्मानने बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आयुष्मान खुराना हा फक्त अभिनेता नसून तो व्हिडीओ जॉकी, अँकर आणि गायक असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आयुष्मानने वयाच्या १७ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तर, वयाच्या २० व्या वर्षी त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.

Ayushmann Khurrana Birthday
Parineeti-Raghav Wedding Card: परिणीती आणि राघवच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का?, लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

येत्या १४ सप्टेंबरला आयुष्मानला बॉलिवूड सिनेसृष्टीत डेब्यू करुन ११ वर्ष झाली आहेत. त्याच्या या सिनेकारकिर्दित त्याचे बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले तर अनेक त्याचे चित्रपट हिट देखील ठरले. एक यशस्वी अभिनेता होण्यासाठी आयुष्मानने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. चंदीगडमधील एका पंजाबी कुटुंबामध्ये जन्मलेल्या आयुष्मान खुरानाचे खरे नाव 'निशांत खुराना' आहे. जेव्हा तो ३ वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या वडीलांनी आणि आईने त्याचे नाव निशांत बदलून आयुष्मान केले.

Ayushmann Khurrana Birthday
Welcome 3 Teaser Cost: ‘वेलकम ३’च्या टीझरवर मेकर्सने केला पाण्यासारखा पैसा खर्च, आकडा पाहून तुम्हालाही बसेल दातखिळी

चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमधून पदवी आणि त्यानंतर पंजाब विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमधून त्याने मास्टर्स केले. त्याला लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न होते. कॉलेजमध्ये असताना आयुष्मानने अनेक नाटाकांतही काम केलं आहे. आयुष्मान खुराना आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो एकेकाळी टेलिव्हिजन स्टारही होता. एमटीव्ही रोडीजच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता देखील होता. त्याने इंडियाज गॉट टॅलेंट, म्युझिक का महामुकाबला, एमटीव्ही रॉक ऑन आणि जस्ट डान्स सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये त्याने होस्टिंग देखील केली आहे. (Actors)

त्याने काही मालिकांमध्ये मुख्य भूमिका सुद्धा साकारली आहे. 'कयामत' आणि 'एक थी राजकुमारी' मालिकेच्या माध्यमातून आयुष्मानने अल्पावधितच स्वत:चा ठसा उमटविला. आयुष्मान खुरानाने २०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने आपल्या सिनेकारकिर्दिला सुरुवात केली. त्याने 'पानी दा रंग' हे गाणं देखील गायलं होतं, त्याचं हे गाणं प्रचंड हिट ठरलं. ‘विकी डोनर’नंतर आयुष्मानने ‘नौटंकी साला’ हा चित्रपट केला होता. यानंतर त्याने ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘दम लगा के हैशा’, ‘अंधाधुंद’, ‘अनेक’सारखे हिट चित्रपट त्याने आपल्या चाहत्यांना दिले. (Bollywood Film)

Ayushmann Khurrana Birthday
Manik Bhide Passed Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन

आयुष्मान खुरानाला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आयुष्मानला 'अंधाधुन'साठी नॅशनल अवॉर्ड (बेस्ट ॲक्टर), 'अंधाधुन' आणि 'आर्टिकल 15'साठी फिल्मफेयर क्रिटिक अवॉर्ड (बेस्ट ॲक्टर), 'विकी डोनर' या चित्रपटासाठी त्याला आयफा अवॉर्डचा (बेस्ट मेल डेब्यू ॲक्टर) आणि 'पानी दा रंग' या गाण्यासाठी फिल्मफेयर अवॉर्ड (बेस्ट मेल प्लेबैक सिंगर) हा पुरस्कार मिळाला आहे. (Entertainment News)

Ayushmann Khurrana Birthday
Girija Oak Interview: गिरीजा ओकने शेअर केले ‘जवान’च्या सेटवरील मजेशीर किस्से, शाहरुखसोबतच्या बॉंडिंगवर अभिनेत्री म्हणाली...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com