Animal And Sam Bahadur Advance Booking Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Advance Booking: रणबीर- रश्मिकाचा ‘ॲनिमल’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुसाट, लवकरच होणार ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समावेश

Animal Box Office Collection: ‘ॲनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई कोणता चित्रपट करणार? याची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Animal Advance Booking

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘ॲनिमल’ची प्रचंड चर्चा होत आहे. येत्या १ डिसेंबरला ‘ॲनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झालेली आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई कोणता चित्रपट करणार? याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकल्निकच्या वृत्तानुसार, एकट्या भारतात ‘ॲनिमल’ चित्रपटाचे सर्वाधिक टिकीटस विकले गेले आहेत. ज्यामध्ये हिंदीमध्ये ९०,५२६ टिकीट्स असून तेलुगू २०, ५९१ तर तमिळमध्ये फक्त २०० टिकीटांचीच विक्री झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण ३.४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट सुद्धा धडाकेबाज ओपनिंग करणार अशी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

‘ॲनिमल’ चित्रपट रणबीर- रश्मिकाच्या सिनेकारकिर्दिला एका वेगळ्याच उंचीवर नेईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाच नाही तर, टीझरला आणि गाण्यांनाही चांगलाच प्रतिसाद होत आहे. या चित्रपटाला सीबीएफसीकडून ‘ए’ रेटिंग मिळाली आहे.

जर ‘सॅम बहादूर’ विषयी बोलायचे तर, विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला ‘सॅम बहादूर’ सुद्धा येत्या १ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण १२, ८७६ इतक्या टिकीटांचीच विक्री झाली आहे. चित्रपटाने जवळपास ४४. ७१ लाखांचीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कमाई केली आहे. दोघांच्याही कमाईचा ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहता ‘ॲनिमल’ चित्रपटच सर्वाधिक कमाई करण्याची शक्यता आहे. (Bollywood Film)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ॲनिमल’च्या पहिल्या दिवसाची कमाई ‘टायगर ३’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षाही जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट कदाचित पहिल्या दिवशी, ५० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT