Anil Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Workout: ईस्ट ओर वेस्ट अनिल कपूर इस द बेस्ट... मायनस ११० डिग्रीमधील अभिनेत्याचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

Anil Kapoor Share Intense Workout Video: अनिल कपूर यांच्या व्हिडिओवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

Pooja Dange

Anil Kapoor shares his intense workout session video: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 66 वर्षांचा आहेत. मात्र, या वयातही तोअनिल कपूर यांचा फिटनेस अनेकांना लाजवेल असा आहे. त्यांनी त्यांच्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अनिल कपूर यांना पाहून त्यांच्या वयाचा अजिबात अंदाज लावता येत नाही. अलीकडेच ऑक्सिजन मास्क घालून ते ट्रेडमिलवर धावताना दिसला. तर आता ते मायनस 110 डिग्रीमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते मायनस टेम्परेचर असलेल्या खोलीत वर्कआउट करताना दिसत आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये तो त्या खोलीतून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये अनिल कापुर यांनी डोक्यावर गरम टोपी घातली आणि आणि अंगावर फक्त जिम करताना वापरली जाणारी शॉर्ट आहे.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते त्या थंड खोलीत व्यायाम करताना दिसत आहेत. मायनस '110 डिग्री' असे त्या खोलीवर लिहिलेले दिसते. अनिल कपूरच्या या व्हिडिओने सर्वांनाच हैराण केले आहे. त्यांनीही या व्हिडिओला कॅप्शन दिले, "40 मध्ये नॉटी होण्याची वेळ आली आहे. 60 व्या वर्षी सेक्सी होण्याची वेळ आली. फायटर मोड सुरू आहे."

ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावण्यापूर्वी त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला होता त्यानेही सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तो व्हिडिओ पाहून सर्वजण त्याच्या फिटनेसचे कौतुक करत होते. त्याचबरोबर मायनस टेम्परेचरमध्ये वर्कआउट करूनही लोक त्याच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.

मात्र, ते त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असल्याचे ‘फायटर मोड ऑन’ या गेल्या दोन वेळेस त्याच्या व्हिडिओंना देत असलेल्या कॅप्शनवरून स्पष्ट होते. अनिल कपूर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर या चित्रपटात दिसणार आहेत.

अनिल कपूर यांच्या या व्हिडिओवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. तर कपिल शर्माने कमेंट करत मला देखील तुमच्यासारखा वर्कआऊट करायचा आहे, असे म्हटले आहे. अनिल कपूर क्रिओ थेरपी घेत असल्याचे एका नेटकाऱ्याने कमेंट करून म्हटले आहे.

अनिल कपूर यांचे फॅन्स देखील त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अनिल कपूर लिजंट आहेत आणि आमच्यासाठी प्रेरणादायी हवेत अशा अनेक कमेंट त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT