Upendra Limaye and Vina Jamkar Saam TV
मनोरंजन बातम्या

Anibani Movie: ‘आणीबाणी'त उपेंद्र आणि वीणाची जोडगोळी, चित्रपटामधील दोघांचा फोटो व्हायरल

‘आणीबाणी'त उपेंद्र आणि वीणाची जोडगोळी, चित्रपटामधील दोघांचा फोटो व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Upendra Limaye and Vina Jamkar Photo Viral: नेमक्याच तरीही सशक्त भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर ही नाव आवर्जून घेतली जातात. हे दोन दिग्गज कलाकार आता 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटातून जोडीच्या रूपाने ग्रामीण अंदाजात दिसणार आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. २८ जुलै रोजी ‘आणीबाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय चित्रपटातून रंजकपणे मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या, अभिमन्यूच्या भूमिकेत उपेंद्र लिमये तर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच विमलच्या भूमिकेत वीणा जामकर आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमच्या मैत्रीमुळे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावरही चांगलीच खुलली असल्याचं या दोघांनी सांगितले. केवळ मनोरंजन एवढा एकच निकष सध्या मराठी चित्रपटांना लागू नाही. अनेक सामाजिक विषयही आज उत्तम प्रकारे हाताळले जात आहेत. ‘आणीबाणी’ चित्रपटाचा वेगळा विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला. .(Latest Entertainment News)

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे.

देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT