Priyanka Chopra Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Dance Video: अनंत- राधिकाच्या लग्नात बॉलिवूडची देसी गर्ल थिरकली;'चिकनी चमेली' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Priyanka Chopra Dance At Anant And Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट काल लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अनंत अंबानीच्या वरातील बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्राने जबरदस्त डान्स केला आहे.

Siddhi Hande

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकला. अनंत अंबानीने आपली बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं एकदम ग्रँड वेडिंग पाहायला मिळाले. या लग्नसोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.याचसोबत अनेक क्रिकेटर, नेतेमंडळीदेखील उपस्थित होते. अनंत अंबानीच्या वरातीत अनेक कलाकारांनी डान्स केला आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेदेखील अनंत अंबानीच्या वरातीत चांगलाच ठेका धरला आहे.

अनंत अंबानीच्या लग्नात प्रियांका चोप्रा, निक जोनास, रणवीर सिंह, दीपिका पदुकोन, आलिया भट्ट, रणबीर कपूरने हजेरी लावली होती. या सर्व कलाकारांनी अनंत अंबानीच्या वरातीत ठेका धरला होता. या सगळ्यात बॉलिवूडच्या देसी गर्लला खूप दिवसांनी हिंदी गाण्यावर नाचताना पाहायला मिळाले.

प्रियांका चोप्राने अनंत अंबानीच्या वरातीत 'सपने मे दिखती है' आणि 'चिकनी चमेली' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. चिकनी चमेली या गाण्यावर प्रियांकाने चांगलाच ठेका धरल्याचे दिसत आहे. प्रियांका चोप्रासोबत रणवीर सिंहनेदेखील डान्स केला आहे. तिच्यासोबत पती निक जोनासनेदेखील हिंदी गाण्यावर ठेका धरला आहे. प्रियांकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनंत अंबानीच्या वरातीत अनिल कपूर आणि रणवीरने वन टू का फोर या आयकॉनिक गाण्यावर डान्स केला होता. तर सारा अली खान, मानुषी छिल्लर, जान्हवी, अनन्या पांडे यांनीदेखील ठेका धरला होता. अनंत अंबानीच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT