Aaradhya Bachchan New Hairstyle Saam Tv
मनोरंजन बातम्या

'इतकी कशी बदलली...', Anant-Radhika च्या प्री-वेडिंगमध्ये आराध्या बच्चनचा जलवा; नवी हेअरस्टाईल पाहून चाहते झाले चकीत

Aaradhya Bachchan Video Viral: या कार्यक्रमातील ऐश्वर्या राय- बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आराध्याचा नवा लूक पाहून सर्वजण चकीत झाले. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा आराध्यावरच खिळल्या होत्या.

Priya More

Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding:

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी (Anant Ambani Pre-Wedding) हॉलिवूडपासून ते बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमामध्ये डान्स आणि सिंगिंग करत चार चाँद लावले. या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाले होते. याच दरम्यान, या कार्यक्रमातील ऐश्वर्या राय- बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आराध्याचा नवा लूक पाहून सर्वजण चकीत झाले. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा आराध्यावरच खिळल्या होत्या. आराध्याच्या नव्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमातील बच्चन कुटुंबीयांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या कार्यक्रमात पोहचलेल्या ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याच्या लूकची खूपच चर्चा होत आहे. नेहमी आपल्या कपाळाला केसाने कव्हर करणाऱ्या आराध्यांची यावेळी नवी हेअरस्टाईल पाहायला मिळाली. आराध्यांच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तिची ही नवी हेअरस्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडली.

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आराध्याने खूपच सुंदर ड्रेसिंग केली होती. आराध्याने व्हाइट कलरचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर सिल्वर सुरोस्कीचे हेवी वर्क करण्यात आले होते. या लेहेंग्यामध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत होती. तिच्या हेअरस्टाइलवरून चाहते नजर हटवू शकले नाहीत. नेहमीच्या बँग्सवाली हेअरस्टाइलमध्ये दिसणारी आराध्याची नवी हेअरस्टाइल खूपच क्युट आहे. यावेळी आराध्याने तिची आई ऐश्वर्या रायसारखी मधून भांग पाडून हेअरस्टाइल केली होती. या लूकमध्ये आराध्या खूपच समजुतदार आणि सुंदर दिसत होती. या व्हिडीओवर कमेंट्स करत काहींनी तर आराध्याला तिच्या आईसारखी दिसत असल्याचे म्हटले आहे.

आराध्याला पाहून सोशल मीडिया युजर्स चकीत झाले. आराध्या पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. एका युजरने कमेंट्स करत लिहिले की, 'आराध्या 5Gच्या स्पीडने मोठी होत आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की,'आराध्या अचानक ऐवढी कशी बदलली?' तिसऱ्या युजरने लिहिले की, अंबानीच्या एका इव्हेंटमध्ये आणखी एक सरप्राइज, आराध्याचा माथा दिसला.' तर काही युजर्सचे असे म्हणणे आहे की, आराध्या सुंदरतेमध्ये आपली आई ऐश्वर्या रायला टक्कर देते. तर काही युजर्सचे असे म्हणणे आहे की, 'आराध्या एकदम ऐश्वर्या राय सारखीच दिसते. जशी ती 90च्या दशकामध्ये दिसायची.' दरम्यान, आराध्याचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ मध्ये झाला. आराध्या सध्या १२ वर्षांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT