Anand Mahindra gets dance lesson from Ram Charan Saam TV
मनोरंजन बातम्या

Viral Video: आनंद महिंद्रा नाटू- नाटू गाण्यावर थिरकले, व्हिडिओवर चाहत्यांनी केले कौतुक

आनंद महिंद्रा यांनी राम चरणसोबत 'नाटु नाटु' गाण्यावरील डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Anand Mahindra-Ram Charan Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा आणि राम चरण एकत्र डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी स्वतः त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडिया खूप सक्रिय आहेत. नेहमीचे ते वेगळं काहीतरी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यावेळी त्यांनी राम चरणसोबत 'नाटु नाटु' गाण्यावरील डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

हैद्राबादमध्ये एबीबी एफआयए फॉर्मुला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपला आनंद महिंद्रा त्याच्या कारसह उपस्थित होते. शुक्रवारी आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या जेन ३ फार्मुला ई रेस कार लाँच केल्या. यावेळी त्यांची भेट राम चरणशी झाली.

या संधी फायदा घेत आनंद महिंद्रा यांनी राम चरणकडून 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटु नाटु' गाण्याच्या काही स्टेप शिकून घेतल्या. त्याचाच व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे, 'कार रेसव्यतिरिक्त, #HyderabadEPrix मध्ये एक खरा बोनस @AlwaysRamCharanकडून #NaatuNaatu गाण्यावरील बेसिक स्टेप शिकता आल्या. धन्यवाद आणि ऑस्करसाठी शुभेच्छा, माझ्या मित्रा!'

राम चरणने देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. '@anandmahindra जी तुम्ही माझ्यापेक्षा लवकर या स्टेप शिकलात... तुमच्यासोबत एक अतिशय गंमतीशीर संवाद झाला. @RRRMovie टीमकडून तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.' असे ट्विट राम चरणने केले आहे.

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील 'नाटु नाटु' या व्हायरल गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये या गाण्यासाठी नामांकन मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच डान्स करून आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT