Amruta Fadnavis  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis : 'मिसेस मुख्यमंत्र्यांचा' बंजारा लूक पाहिलात का? नवीन गाणं प्रदर्शित, पाहा VIDEO

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यातील त्यांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस या उत्तम गायिका आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. नुकतेच त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याचे नाव मारो देव बापू सेवालाल' (Maro Dev Bapu Sevalal) असे आहे. या गाण्यात अमृता फडणवीस बंजारा पोशाखात पाहायला मिळत आहे. टी-सीरीजच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी बंजारा लूक केला आहे. या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहे. तर संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे.

अमृता फडणवीस या कायमच आपली कला जपताना पाहायला मिळतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे इन्स्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमृता फडणवीस या एक आघाडीच्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. अमृता फडणवीस यांनी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस देखील खूप उत्तम गाते. माय-लेक आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अमृता फडणवीस यांच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Maharashtra Live News Update : अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

नागपूर हादरलं! मुलीच्या डोक्याला दुखापत, मुलाच्या छातीवर शस्त्रानं वार; नंदनवन कॉलनीतील 'त्या' खोलीत जोडप्यासोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT