Amruta Deshmukh-Prasad Jawade Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Deshmukh-Prasad Jawade Wedding :अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या घरी लगीनघाई; ग्रहमखाचे सुंदर फोटो केले शेअर

Amruta Deshmukh-Prasad Jawade: अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amruta Deshmukh-Prasad Jawade Share Photo Of weedding Rituals:

बिग बॉस मराठी ४' मधील सर्वात जास्त चर्चेत आलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही उत्तम कलाकार आहेत. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. हे दोघेही १८ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. लग्नाला अवघे काही दिवस उरले असून या दोघांच्या घरात लगीनसराई सुरू झाली आहे.

अमृता आणि प्रसादच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अमृताने सोशल मीडियावर ग्रहमखाचे फोटो शेअर केले आहेत. अमृताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे. तर प्रसादनेदेखील रंगेबिरंगी डिझाइन असलेला कुर्ता घातला आहे. हे दोघेही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अमृताने याआधीही केळवणाचे फोटो शेअर केले होते.

अमृता नेहमीच सोशल मीडियावरुन दोघांचे फोटो शेअर करत असते. अमृताने काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या आमंत्रणाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने स्वत:ची कविता लिहली आहे. 'समांतर असा सुरु होता त्या दोघांचा प्रवास... अनपेक्षित क्षणी आला सक्तीचा सहवास! भिन्न स्वभाव, भिन्न विचार, प्रेमावर मात्र दृढ विश्वास... आधी घेतला हातात हात, मग तिने सोजली नाही कधीच साथ...! दोन मनांचा सुरु झाला होता Experimental संवाद.. मात्र, Permanant सुखी जीवनासाठी हवेत आता फक्त तुमचे आशीर्वाद...!'असं म्हणत त्या दोघांच्या फोटोंचे ग्राफिक्स शेअर केले आहेत.

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनी त्यांना सुखी संसारासाठी आशीर्वाद दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT