Prasad Jawade- Amruta Deshmukh Romantic Video Saamtv
मनोरंजन बातम्या

Prasad Jawade- Amruta Deshmukh : 'आम्ही खूप वेगळे आहोत' म्हणत अमृता - प्रसादने केला रोमँटिक व्हिडीओ शेअर

Prasad Jawade- Amruta Deshmukh Romantic Video : अमृताने सोशल मीडियावर एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amruta Deshmukh Shares Cute Video :अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे 'बिग बॉस' मराठी सीजन ४ पासून चर्चेत आले. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. पण प्रसादने बिग बॉसमध्ये असताना अमृताचे प्रेम स्वीकारले नव्हते. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर दोघांचे मैत्री नाते प्रेमात बदलले आणि त्यांनी साखरपुडा करत प्रेक्षकांना धक्का दिला.

काही दिवसांपूर्वी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी साखरपुडा केला. पोस्ट पोस्ट करत दोघांनी हे बातमी सोशल मीडियावर शेअर केली. दोघांच्या या बातमीनंतर अनेकांना सुखद धक्का बसला. त्यानंतर दोघांवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. आता अमृताने त्यांच्या एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. (Latest Entertainment News)

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे व्हिडीओ

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी त्यांच्या एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता आणि प्रसाद यांचे रोमॅंटिक क्षण दाखविण्यात आले आहे. तर या व्हिडीओमध्ये प्रसाद अमृताला रिंग घेऊन प्रपोज करताना दिसत आहे.

प्रसाद अमृतासाठी गुलांबाचा पुष्पगुच्छ घेऊन जाताना दिसत आहे. या गुच्छात त्यांने एक रिंग ठेवली आहे. प्रसादच्या या स्टाईलवर अमृता फिदा झाल्याचे दिसत आहे.या व्हिडिओमुळे त्यांच्या प्रेमाला अजून बहर आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांनी खास त्यांच्या प्रेमाचा खुलासा करण्यासाठी केला आहे.

'प्रसाद आणि मी एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. पण एक गोष्ट जी आमच्यात सारखी आहे ती म्हणजे, आम्हा दोघांना अगदी साध्या साध्या गोष्टीत आनंद मिळतो. आमची पहिली डेट एआरएआय टेकडीवर झाली. आम्ही तिथे थेट कॉफी घेऊनच पोहोचलो. इथून पुढील आयुष्यात खूप चढउतार असू शकतात.

परंतु आम्हाला खात्री आहे की, आमच्या या साध्या जीवनात आम्हाला खूप आनंद मिळेल. आम्ही हा व्हिडिओ आमच्या भविष्यासाठी एक आठवण म्हणून बनवण्याचा निर्णय घेतला आहे . साध्या गोष्टी आश्चर्यकारक आणि छान असतात'.असं कॅप्शनही या व्हिडिओला दिल आहे.

प्रसाद आणि अमृताच्या या व्हिडिओवर चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : पाठीत खंजीर खुपसणारा मित्र कसा ओळखाल? चाणक्यांनी सांगितलं भयानक गुपित

Maharashtra Live News Update : बारामती ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल

GST Reforms: कारचं स्वप्न होणार पूर्ण, ही मिनी कार तब्बल ३ लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

Navapur : युरियाचा कृत्रिम तुटवडा; किंमतीपेक्षा अधिक दराने युरिया बॅगची विक्री, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? मोठ्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT