Amitabh Bachchan New Film Announce Twitter
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Latest Film: बिग बी पुन्हा करणार कोर्ट रुम ड्रामा, 'Section 84' मध्ये साकारणार अनोखी भूमिका

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan New Film: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटात कोर्टरूम ड्रामा दिसणार असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करणार आहेत. 'सेक्शन 84' असे नाव असलेल्या या थ्रिलर चित्रपटामध्ये बिग बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाची घोषणा करताना, अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, "या नवीन चित्रपटासाठी प्रतिष्ठित सर्जनशील विचारांच्या सहवासात राहून पुन्हा एकदा आनंद झाला आणि माझ्यासाठी हे आव्हान निर्माण झाले आहे."

अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक रिभू दासगुप्तासोबतची तिसरी कलाकृती आहे. युद्ध या टेलिव्हिजन मालिकेतून आणि Te3n या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. बिग बींसोबत काम करताना दिग्दर्शक रिभू दासगुप्ता म्हणतात, "बिग बींसोबत काम करताना मला फार आनंद होतो. आता पर्यंत मी त्यांच्यासोबत काही चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळाच आनंद वाटतो."

'सेक्शन 84'च्या दिग्दर्शनाची आणि लेखकाची धुरा रिभू दासगुप्ता यांच्याकडे आहे. बिग बींनी कोर्ट रुम ड्रामा असलेल्या 'पिंक' या चित्रपटात ते होते. त्या चित्रपटात त्यांनी तापसी पन्नूसोबत स्क्रिन शेअर केली होती.

बिग बींचे काही चित्रपट लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहेत. 'गणपथ: पार्ट 1' आणि 'प्रोजेक्ट के' मध्ये दिसणार आहेत. सोबतच 'घूमर'चित्रपटाची शूटिंग देखील आवरली आहे, तर 'द इंटर्न' या चित्रपटातही बिग बी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

Gajlaxmi Rajyog 2026: पुढच्या वर्षी शुक्र बनवणार पॉवरफुल योग; 'या' 3 राशींच्या नशीबी धनलाभ

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT