Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींवर अमिताभ बच्चन भडकले, नेमकं घडलं काय?

Amitabh Bachchan Video : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींवर चिडताना दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. त्यांना एक नजर पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमी गर्दी पाहायला मिळते. सध्या बिग बींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन चिडताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या आलिशान घरातून बाहेर येताना दिसत आहेत. तेव्हा फोटोग्राफरने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. हे पाहून अमिताभ बच्चन खूप चिडले. पापाराझींवर खूप संतापले. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव आणि हातांची हालचाल त्यांचा राग व्यक्त करत होता. त्यांनी फोटोग्राफरला रिकॉर्डिंग बंद करण्यास सांगितले.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिताभ बच्चन म्हणाले की, "व्हिडिओ घेऊ नका..." अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. बिग बींचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 मध्ये रिलीज झालेला 'कल्की 2898 एडी'मध्ये अमिताभ बच्चन एका खास भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखील झाले.

अमिताभ बच्चन यांना चित्रपटांसोबतच 'कौन बनेगा करोडपती' साठी ओळखले जाते. त्यांनी आजवर 'कौन बनेगा करोडपती' या धमाकेदार रिअ‍ॅलिटी शोचे होस्टिंग केले आहे. त्यांची होस्टिंग शैली देखील चाहत्यांना खूप आवडते. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. अमिताभ बच्चन लवकरच 'कल्की 2898 एडी'च्या दुसऱ्या भागातही दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT