KBC 14 SAAM TV
मनोरंजन बातम्या

KBC 14 : बिग बी 'या' बॉलीवूड अभिनेत्याचे चाहते, KBC 14 मध्ये केला खुलासा

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती' हा शो अमिताभ बच्चन यांनी खूप मनोरंजक बनवला आहे. अलीकडेच या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे खूप कौतुक केले आहे.

Shreya Maskar

KBC 14 मुळे आपल्याला अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachcha) छोट्या पडद्यावरही पाहायला मिळतात. दरवर्षी टीव्ही प्रेक्षक अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) शो च्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच केबीसीच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी ते कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याचे चाहते आहेत याचा खुलासा केला आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी संपूर्ण जग वेडे आहे. त्यांच्या विषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. ज्यांच संपूर्ण जग दिवाण आहे, ते स्वतः मात्र अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचे चाहते आहेत. KBC 14 च्या शोवर 'बिग बी' ने सांगितले की, बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीकडून त्यांना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात.

अमिताभ बच्चन यांनी पंकज त्रिपाठी यांचे केले कौतुक

'कौन बनेगा करोडपती'च्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला पंकज त्रिपाठी यांच्या चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की, 'बॉलिवुड अभिनेता पंकज त्रिपाठीने त्याच्या 'मैं अटल हूं' या चित्रपटात कोणाची भूमिका साकारली होती?' त्याला उत्तर म्हणून 4 पर्याय देण्यात आले. त्यापैकी बरोबर उत्तर होते ‘अटल बिहारी वाजपेयी’. या प्रश्नाला स्पर्धकानेही अचूक उत्तर दिले, त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कॅमेऱ्यासमोर पंकज त्रिपाठीचे कौतुक केले. अमिताभ बच्चन म्हणाले की, 'तो आपल्या चित्रपटसृष्टीचा एक सक्षम कलाकार आहे. मी त्यांचे सर्व चित्रपट पाहतो आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकतो, त्यांची कला खूप चांगली आहे.' अमिताभ बच्चन यांच्याकडून पंकज त्रिपाठीची स्तुती ऐकल्यानंतर केबीसीच्या मंचावर उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.

पंकज त्रिपाठी - KBC

2021 मध्ये पंकज त्रिपाठी आणि अभिनेता प्रतीक गांधी यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'मध्ये पाहुणे म्हणून भाग घेतला होता. या जोडीने संपूर्ण २५ लाख रुपये जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT