amitabh bachchan kaun banega crorepati 15 saam tv
मनोरंजन बातम्या

KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' च्या पहिल्या स्पर्धक कोण? २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही अन्...

Kaun Banega Crorepati 15 : अमिताभ बच्चन होस्ट असलेल्या 'कौन बनेगा करोडपती १५' ची धमाकेदार सुरुवात झाली.

Saam TV News

Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती १५' ची धमाकेदार सुरुवात झाली. या शोचे होस्ट सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या खेळाची सुरुवात केली. या पर्वाच्या पहिल्या एपिसोडच्या हॉटसीटवर हवाई दलाच्या अधिकारी (निवृत्त) सुष्मिता सहाय होत्या. त्यांनी शोची चांगली सुरुवात केली. या खेळात सुष्मिता यांनी नवीन लाइफलाइन 'सुपर संदूक'चीही मदत घेतली. (Latest Entertainment News)

अमिताभ बच्चन यांनी सुष्मिता सहाय यांना पहिला प्रश्न विचारला. हा प्रश्न एका छायाचित्रावर आधारित होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत त्यांनी १००० रुपये जिंकले. पुढील खेळातही त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. जसाजसा हा खेळ पुढे जात होता, तसतसा हा खेळ अधिक रंजक होत गेला.

मी तुमची खूप मोठी फॅन आहे, असं हॉटसीटवर बसलेल्या सुष्मिता सहाय यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं. बीग बींवर क्रश आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावर अमिताभ बच्चन यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

प्रश्नोत्तरांचा हा खेळ रंगत होता. सुष्मिता सहाय यांनी ६, ४०,००० रुपयेही जिंकले. या जिंकलेल्या पैशांचं काय कराल, असा प्रश्न बीग बींनी त्यांना विचारला. त्यावर नॉर्दन लाइट्स बघण्याचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं उत्तर सहाय यांनी दिलं. (Kaun Banega Crorepati 15)

त्यानंतर बच्चन यांनी सुष्मितांना १२, ५०००० रुपयांसाठी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सुष्मिता अडखळल्या. त्यांनी ऑडियन्स पोलची मदत घेतली आणि उत्तर दिलं. यावेळी प्रेक्षक त्यांच्या मदतीला धावले आणि उत्तर बरोबर आल्यानं त्यांनी ही रक्कमही जिंकली.

अमिताभ बच्चन यांनी त्यांना २५ लाखांसाठी पुढचा प्रश्न विचारला. मात्र, त्याचं उत्तर ठाऊक नसल्यानं अखेर त्यांनी या खेळातील प्रवास इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: उत्पन्न एक रूपयाही नाही, तरीही आयटीआर भरावा का? आयकर विभागाचा नियम वाचा

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Gold Rate : पिवळ्या धातूची चमक कायम, नव्या उच्चांकावर पोहचलं, वाचा आजचे दर

Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना

Sambhajinagar : घरात घुसून माय-लेकींना मारहाण; संभाजीनगरात किरकोळ वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT