Unchai Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Amitabh Bachchan : बिग बींकडून चाहत्यांना 'शॉल्लिड' गिफ्ट

वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून बिग बींचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ११ ऑक्टोबर अर्थात उद्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. उद्या अमिताभ बच्चन ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मनोरंजन क्षेत्रातील (Marathi Entertainment News) बिग बींचे परममित्र प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह आदी कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. जय आणि वीरुची गेल्या पाच दशकापासून पडद्यावर आणि पडद्याआड मागेही चांगली मैत्री असून दोघांनीही शोले चित्रपटात एकत्रित काम केले होते. बिग बींचा आगामी चित्रपट 'उंछाई' येत असून चित्रपटाला शुभेच्छा देत वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. (Bollywood) (Bollywood Actor)

वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून बिग बींचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सूरज बडजात्या दिग्दर्शित चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'उंछाई' हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी एकत्र काम केले आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे, अमिताभ यांनी अलिकडेच त्यांच्या अतिशय लोकप्रिय ऑनलाइन ब्लॉगमध्ये 'उंछाई' बद्दल बरेच काही लिहिले होते.

फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये मैत्रीचा भाव अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील 'मैत्री हीच त्यांच्या जीवनाची प्रेरणा होती!' ही टॅगलाईन आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या चित्रपटाची थीम पहाता वीरू (धर्मेंद्र)ने जय (अमिताभ)ला त्याच्या 'उंछाई' चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

शतकातील सर्वात मोठ्या सुपरहिरोच्या व्यक्तिमत्त्वातील दोन विरुद्धार्थी पैलूंची झलक चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. पोस्टरमध्ये एकीकडे अमिताभ बच्चन अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहेत, तर दुसरीकडे ते बर्फाळ हवामानात पर्वतांमध्येही महत्त्वाकांक्षी दिसत आहेत, त्यांच्या डोळ्यात आशेचेही किरण दिसून येत आहेत.

इंडस्ट्रीत ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या खास निमित्त राजश्री प्रॉडक्शनतर्फे 'उंछाई' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिग्गज कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाकडे वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून पाहिले जात आहे. 'उंछाई' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांनी सजलेला एक महत्त्वाचा चित्रपट आहे, ज्यामध्ये मैत्रीची भावना वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इरामी, सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात डॅनी डेंजोप्पा आणि नफिसा अलीसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

SCROLL FOR NEXT