Amitabh Bachchan Flipkart Add Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांना 'ती' जाहिरात करणं पडलं महागात, पोलिसात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

Amitabh Bachchan's Flipkart Advertise Controversy: ऑनलाइन शॉपिंग ॲप फ्लिपकार्ट कंपनीच्या जाहिरातीमुळे बिग बी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Chetan Bodke

Amitabh Bachchan Flipkart Advertise

कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारे बिग बी सध्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आले आहेत. ऑनलाइन शॉपिंग ॲप फ्लिपकार्ट कंपनीच्या एका जाहिरातीमध्ये त्यांनी काम केलं होतं. या जाहिरातीमुळेच ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ‘या वस्तू दुकानात मिळणार नाही...’ असं बिग बींनी या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं. या डायलॉगमुळे आणि खोटी माहिती दिल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर बिग बी यांची फ्लिपकार्टसाठी केलेली जाहिरात प्रचंड चर्चेत आली आहे. बिग बी फ्लिपकार्टचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. त्या जाहिरातीत ते प्रेक्षकांना 'द बिग बिलियन डेज'च्या ऑफर्सबद्दल माहिती देताना दिसत आहेत. या जाहिरातीमधील एका वाक्यामुळे बिग बी यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिग बी या जाहिरातीच्या माध्यमातून सांगतात की, “या वस्तू दुकानात मिळणार नाहीत.” या डायलॉगमुळे सर्व दुकानदार बिग बींवर नाराज झाले आहेत. बिग बींवर खोटी माहिती आणि ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने केला आहे.

कॉन्फीडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटीने ही जाहिरात पाहून बिग बींवर चांगलीच टीका केली आहे. सीएआयटीने असं म्हटलं आहे की, 'अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेली जाहिरात छोट्या दुकानदारांच्या विरोधात जाणारी आहे. त्यामुळे कंपनीने ही जाहिरात मागे घ्यावी. या जाहिरातीतून अमिताभ यांनी छोट्या दुकानदारांचा अपमान केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अमिताभ यांच्याविरोधात 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा.' अशी मागणी सीएसआयटीने केली आहे.

सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 2 (47) नुसार, फ्लिपकार्टने अमिताभ बच्चन यांच्यामार्फत जनतेची दिशाभूल केली जात आहे. या जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, फ्लिपकार्टवर मोबाईल ज्या किंमतीत उपलब्ध आहे. त्या किंमतीत कोणताही दुकानात ही वस्तू मिळणार नाही. त्यामुळे दुकानदारांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वादानंतर आता फ्लिपकार्टने ही जाहिरात सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रायव्हेट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT