Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री? 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण

Amitabh Bachchan-Salman Khan : बिग बी अमिताभ बच्चन सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. त्यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सलमान खान लवकरच 'बॅटल ऑफ गलवान'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बॅटल ऑफ गलवान'मध्ये सलमान खानसोबत अमिताभ बच्चन देखील झळकणार असल्याचे बोले जात आहे.

अमिताभ बच्चन आणि 'बॅटल ऑफ गलवान'चे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सध्या 'बिग बॉस 19' चे होस्टिंग करत आहे. तसेच सलमान खान लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खान खूप वेळापासून 'बॅटल ऑफ गलवान' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया हे करत आहेत. अशात सोशल मीडियावर अपूर्व लाखिया आणि अमिताभ बच्चन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

अपूर्व लाखिया आणि बिग बींचा एकत्र फोटो पाहून अमिताभ बच्चन हे 'बॅटल ऑफ गलवान' मध्ये झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. त्यांची 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये एन्ट्री झाल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे. अपूर्व लाखिया कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बॅटल ऑफ गलवान'चे अपडेट देत असतात.

अपूर्व लाखिया यांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यावरून अमिताभ बच्चन हे 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फोटोला त्यांनी हटके कॅप्शन दिले होते. त्यांनी लिहिलं की. "ते मला काय सांगत आहेत अंदाज लावा" तसेच हॅशटॅगमध्ये 'लीजेंड ऑन सेट टुडे' असे लिहिलं आहे.

अपूर्व लाखिया आणि अमिताभ बच्चन यांचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता पुन्हा एकदा सलमान खान आणि अमिताभ बच्चन ही जोडी एकत्र पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेपाळ, बंगालनंतर आता 'या' देशातील सरकारविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर; आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू

'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

Free Mobile Recharge Plan for One Year: मोदींकडून वर्षभर मोबाईल फ्री रिचार्ज? 1 GB डेटाही क्षुल्लक किंमतीत मिळणार?

Indian Railways Update: प्रवाशी मित्रांनो कृपया लक्ष द्या! कोणालाच नाही मिळणार तिकीट; चौकशी असो की बुकिंग, सर्व कामं असतील ठप्प

Maharashtra Politics: आता राजसेना विरूद्ध शिंदेसेना, 'गडकिल्ल्यांवरील नमो सेंटर फोडणार'

SCROLL FOR NEXT