Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझला खलिस्तानी पन्नूची धमकी, अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन

Diljit Dosanjh Gets Threat : प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला धमकी मिळाली आहे. खलिस्तानी पन्नूने ही धमकी दिली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Diljit Dosanjh Gets Threat
Diljit DosanjhSAAM TV
Published On

दिलजीत दोसांझला खलिस्तानी पन्नूने धमकी दिली आहे,

खलिस्तानी पन्नूने संगीत कार्यक्रम रद्द करण्याची धमकी दिलजीतला दिली आहे.

पन्नू यांच्या धमकीचा संबंध बॉलिवूड मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ कायम त्याच्या गाण्यामुळे चर्चेत असतो. त्याचे गाण्याचे जगभरात चाहते आहेत. कॉन्सर्टमध्ये तो आपल्या आवाजाने चारचाँद लावतो. अशात आता बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिलजीत दोसांझला धमकी देण्यात आली आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांनी दिलजीत दोसांझला धमकी दिली आहे. पन्नूने 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणारा दिलजीत दोसांझचा संगीत कार्यक्रम रद्द करण्याची धमकी दिली आहे.

पन्नू यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केला आहे. पन्नू यांच्या मते अमिताभ बच्चन यांनी 1984 च्या हत्याकांडातील गुन्हेगारांना पाठिंबा दिला. ते म्हणाले की, अमिताभ बच्चन यांनी नर संहाराला विरोध केला नाही. अशा व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून दिलजीत दोसांझने त्या दंगलींमध्ये झालेल्या प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि अनाथ झालेल्या प्रत्येक मुलाचा अपमान केला आहे.

पन्नू यांच्या धमकीचा संबंध बॉलिवूड मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी आहे. पन्नूने 'बिग बीं'चे पाय स्पर्श करणे हे 1984 च्या हत्याकांडातील पीडितांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. पन्नूने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दिलजीत दोसांझ यांनी अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श करून 1984 च्या हत्याकांडातील पीडितांचा अपमान केला आहे. दिलजीतने असे करून 1984 च्या प्रत्येक पीडितेचा, विधवा आणि अनाथाचा अपमान केला आहे.

दिलजीत दोसांझने 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 1 नोव्हेंबर या दिवशी अकाल तख्त साहिबने शीख नरसंहार स्मृतिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नू यांनी असा दावा केला की, अमिताभ बच्चन यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी 'खून का बदला खून' हा नारा दिला होता, ज्यामुळे जमावाला भडकावण्यात आले.

Diljit Dosanjh Gets Threat
Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat : 'थामा'ची मंगळवारी बक्कळ कमाई; 100 कोटींचा आकडा पार, मोडला 'हा' रेकॉर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com