Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : बिग बींनी स्टाफला दिलेलं दिवाळी गिफ्ट पाहून नेटकरी संतापले, म्हणाले- 'लज्जास्पद...', VIDEO व्हायरल

Amitabh Bachchan Diwali Bonus To Staff : बिग बी अमिताभ बच्चन यांनी कर्मचाऱ्यांचा दिवाळी गिफ्ट दिले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोनस पाहून नेटकरी संतापले.

Shreya Maskar

अमिताभ बच्चन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी कर्मचाऱ्यांचा दिवाळी गिफ्ट दिले आहे.

दिवाळी गिफ्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी फक्त मिठाई आणि छोटी रक्कम कर्मचाऱ्यांना दिली.

नुकतीच दिवाळी झाली आहे. दिवाळीला ऑफिसमधून गिफ्ट्स दिले जातात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात आता अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांचा आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या स्टाफला दिवाळीत गिफ्ट काय दिले हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक कंटेंट क्रिएटर अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्या बाहेर पाहायला मिळत आहे. तेथे त्यांनी बंगल्या बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्याशी संवाद साधला आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरी काम करणारा स्टाफ हातातील मिठाईचा डबा दाखवत आहे. तसेच त्यांना रक्कम दिल्याचे सांगत आहे. क्रिएटरने रक्कम विचारल्यावर स्टाफ म्हणाला की, "आम्हाला मिठाईचा बॉक्स आणि 10 हजार रोख रक्कम देण्यात आली आहे. "

व्हिडीओमध्ये क्रिएटर बिग बींचा सजवलेला बंगला दाखवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "बॉलिवूडचे सर्वात मोठे अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील जुहू येथील घर... अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये रोख आणि मिठाईचा डबा दिला." या व्हिडीओवर मात्र नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

कमेंट्समध्ये काही लोक अमिताभ बच्चन यांचे कौतुक करत आहेत. तर काही लोकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण लोकांना बोनसची रक्कम खूप कमी वाटली आहे. अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीच्या तुलनेत रोख रक्कम कमी असल्याचे सर्वत्र बोले जात आहे. "ही दुःखद गोष्ट आहे...", "फक्त 10 हजार रुपये. खूपच लाजिरवाणे...", " 10 हजार रुपये हे फार कमी पैसे आहेत...", "येथे लोकांना दिवाळीला 20-25 हजार रुपये बोनस मिळतो...", "स्टारसाठी 24 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापेक्षा जास्त पैसे मिळायला हवे..." अशा कमेंट्स व्हिडीओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT