amitabh bachchan congrats to gukesh d world champion in chess Google
मनोरंजन बातम्या

Gukesh D : तुझ्यामुळे संपूर्ण जग भारताला… वर्ल्ड चॅम्पियन गुकेश डीचे अमिताभ बच्चन यांनी केले अभिनंदन

Gukesh D world champion : गुकेश डीने १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत वयाच्या १८ व्या वर्षी सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. यानिमित्ताने अनेक बड्या व्यक्तींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gukesh D : भारताचा युवा स्टार गुकेश डी याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. यावेळी त्याला देशभरातील बड्या व्यक्तींकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी त्याला शुभेच्या देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे देखील नाव आहे.

काही महिन्यांपासून सिंगापूरमध्ये बुद्धिबळासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपची लढत सुरू होती, त्यात भारताचा गुकेश डी आणि चीनचा लिरेन हे स्पर्धक फायनल्ससाठी खेळात होते. गुकेशने गुरुवारी जिंकलेल्या या विजेतेपदावर लोकांच्या नजरा खिळल्या होत्या. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप गाठणारा गुकेश हा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.

अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन केले

अमिताभ बच्चन यांनी X वर पोस्ट केले आणि लिहिले की गुकेश डी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता आहे. तुझा आम्हा सर्वांना अभिमान आहे, तुझ्यामुळे संपूर्ण जग भारतला सलाम करत आहे. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, कंगना राणौत, ज्युनियर एनटीआर, कमल हसन यांसारख्या बॉलीवूड स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टद्वारे गुकेशचे अभिनंदन केले.

अमिताभच्या शोमध्ये दिलेला संदेश

गुकेश अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती शोमधील स्पर्धकाला व्हिडिओ संदेश देताना दिसला होता. वास्तविक, शोमध्ये एका स्पर्धकाने भाग घेतला होता, ज्याने सांगितले की त्याला बुद्धिबळात खूप रस आहे, यावर गुकेशचा एक व्हिडिओ शोमध्ये त्याच्यासाठी एक सरप्राईज म्हणून प्ले करण्यात आला होता, ज्यामध्ये गुकेशने त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुकेश डीच्या आधी वर्ल्ड चॅम्पियनचा किताब विश्वनाथन आनंदकडे होता, त्याने २०१२ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन हा किताब पटकावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT