Ameesha Patel Bold Look Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

४६व्या वर्षीही हॉट दिसतेय ही अभिनेत्री; बोल्ड लूकने वाढवला इंटरनेटचा पारा

अमिषा पटेलने तिचे नवीन बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या फोटोंमध्ये अमिषा स्विमिंग पूलजवळ चिल करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल(Amisha Patel) भलेही रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. अमिषा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे तिच्या चाहत्यांना तिच्याविषयीची प्रत्येक अपडेट देत असते. आताही अमिषाने तिचे नवीन बिकिनी फोटो (Social Media) सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

अमिषाच्या या फोटोंमध्ये अमिषाने काळ्या रंगाची डिझायनर बिकिनी घातली आहे. या फोटोंमध्ये अमिषा स्विमिंग पूलजवळ चिल करताना दिसत आहे. डिझायनर बिकिनीसोबत आमिषा नो मेकअप लूकमध्ये किलर दिसत आहे. स्वतःच्या नावाचे नेकपीस आणि हुप्स इअर रिंग्स आमिषाचा लूक आणखीनच बोल्ड बनवत आहे. काळ्या बिकिनीसोबतच अभिनेत्रीने काळ्या रंगाचे मोठे फंकी सनग्लासेस देखील घातले आहेत. अमिषाचे हे सनग्लासेस तिच्या लूकचा स्वॅग वाढवत आहे.

अमिषा पटेलच्या स्टाइलपासून ते अॅटिट्यूडपर्यंत सगळंच परफेक्ट आहे. अमिषाच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत. 'काळा रंग नेहमीच सुंदर असतो', असे अमिषानं तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत. 'हॉट बेबी' असे एका नेटकऱ्याने लिहिले, तर अनेक यूजर्स फायर ईमोजी तिच्या पोस्टवर शेअर करत आहेत.

अमिषाने रोमँटिक थ्रिलर 'कहो ना प्यार है' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉलिवूड जगतामध्ये अमिषाची रातोरात चर्चा सुरु झाली. आमिषाने 'गदर', 'रेस २', 'भूल भुलैया' अशा अनेक चित्रपटामध्ये काम केलं. त्यानंतर बरीच वर्षे अमिषा सिनेविश्वापासून लांब होती. आता वयाच्या ४६व्या वर्षी पण तिचा बोल्ड अॅण्ड हॉट लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: दर्गा बेकायदा असल्याचा दावा; सकल हिंदू समाज आक्रमक, पाहा VIDEO

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT