Amhi Jarange Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amhi Jarange Film : ‘आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा’ मध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका कोण साकारणार ?; टीझर रिलीज, पाहा Video

Amhi Jarange Teaser : संपूर्ण मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास ‘आम्ही जरांगे’ चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Chetan Bodke

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. आजही हे आंदोलन कायम सुरू आहे. संपूर्ण मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक सुरू होती, त्यामुळे निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती निवडणूक आयोगाने उठवली असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 'आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा' असं चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. या टीझरमध्ये, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या सभा, उपोषणासाठी बसलेले काही किस्से, त्यांच्यावर करण्यात आलेला लाठीचार्जसह अनेक किस्से पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला चित्रपटाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

टीझर शेअर करताना निर्मात्यांनी, "कर्म मराठा, धर्म मराठा! मराठ्यांचा नवीन सरदार! ‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा! १४ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात" असं कॅप्शन दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केली असून निर्मिती नारायणा प्रॉडक्शनने केली आहे.

चित्रपटाचे कथानक सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मकरंद देशपांडे हे साकारत असून या व्यतिरिक्त सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT