Donald Trump  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Donald Trump आहेत 'बिग बी' अन् 'किंग खान'चे मोठे फॅन, आवडते चित्रपट सांगत केला खुलासा

America President Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन आहेत. या सुपरस्टारचे कोणते चित्रपट डोनाल्ड ट्रम्प यांना आवडतात जाणून घ्या.

Shreya Maskar

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (America President Donald Trump ) यांचे संपूर्ण जगावर लक्ष आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाअंतर्गत भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी बॉलिवूडचे कौतुक केले आहे. तसेच आपला आवडता अभिनेता आणि चित्रपट यांचा देखील त्यांनी खुलासा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना बॉलिवूडच्या सुपरस्टारचे दोन चित्रपट खूप आवडतात. बॉलिवूडचे सुपरस्टार हे दुसरे-तिसरे कोणी नसून बिग बी आणि किंग खान आहेत. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट डोनाल्ड ट्रम्प यांना खूप आवडतो. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटात शाहरुख खानसोबत काजोल देखील मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांचा 'शोले' हा चित्रपट डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत आवडता आहे. 'शोले' या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachcha) यांच्यासोबत धर्मेंद्र यांनीही काम केले आहे. 'शोले' (Sholay) हा आयकॉनिक चित्रपट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन्ही चित्रपट खूप आवडतात. त्यांनी हे चित्रपट पाहिले आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय संगीताचेही खूप कौतुक केले आहे.

२०२० साली देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा दौरा केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हॉलिवूडच्या चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांनी 'घोस्ट कान्ट डू इट' या चित्रपटात अभिनय केलाय. त्यांचे अनेक लोकप्रिय चित्रपट देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT