Ameesha Patel On Kaho Naa...Pyaar Hai 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ameesha Patel: 'कहो ना प्यार है २' चित्रपट येणार? अमिषा पटेलने सांगितले, 'राकेश अंकल आणि...'

Ameesha Patel On Kaho Naa...Pyaar Hai 2: अलीकडेच अमिषा पटेलला 'कहो ना प्यार है' च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की 'कहो ना प्यार है २' प्रेक्षकांच्या मागणीनुसार बनवला पाहिजे.

Shruti Vilas Kadam

Ameesha Patel: २५ वर्षांपूर्वी 'कहो ना... प्यार है' या चित्रपटातून अमिषा पटेल आणि हृतिक रोशन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या वर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आणि या २५ वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांना पुन्हा एकदा हृतिक आणि अमिषा यांच्यातील केमिस्ट्री आवडली आणि त्यांनी सिक्वेलची मागणी केली. आता अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले मन मांडले आहे.

अमिषा पटेलला माध्यमांनी 'कहो ना... प्यार है' या चित्रपटाच्या संभाव्य सिक्वेलबद्दल विचारले. यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'राकेश अंकलला विचारा. हृतिकला विचारा... मला हा चित्रपट झाला तर खूप आनंद होईल. २५ वर्षांपूर्वी जेव्हा 'कहो ना प्यार है' पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरहिट झाला आणि त्याने अमिषा आणि हृतिक दोघांनाही स्टारडम मिळवून दिले. एका खास संभाषणात, अमिषा पटेलने या चित्रपटाने तिचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले.

अभिनेत्री म्हणाली, ' मी या चित्रपटामुळे एका सामान्य मुलीपासून आपण एक सेन्सेशन बनले .' रोहित आणि सोनिया संपूर्ण देशाचे क्रश बनले. हा एक सामान्य चित्रपट नव्हता. लोकांनी त्या पात्रांना त्यांच्या घरी नेले. त्यानंतर मी अनेक दिवस सुन्न होते. मला हे कसे झाले समजत नव्हते. खरंतर मी कधी याची कल्पनाही केली नव्हती.

अभिनेत्री म्हणाली, ' एक सामान्य मुलगी ते सर्वांच्या हृदयाची धडधड अशी वाटचाल होणे हा एक मोठा बदल आहे. कहो ना प्यार है सारख्या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकता. रोहित आणि सोनिया संपूर्ण देशाचे क्रश बनले. विमानतळावर, रेस्टॉरंटमध्ये, जिममध्ये, कुठेही जा लोक ओळखू लागले. लोकांना ऑटोग्राफ हवा होता. हा आमच्या या चित्रपटामुळे मिळालेला स्टारडमचा पहिलाच अनुभव होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT