Pushpa The Rule OTT Rights Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa The Rule OTT Rights: प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा २: द रुल’चे स्ट्रीमिंग राईट्स विकले, अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Pushpa 2 The Rule Latest News: चित्रपट आगामी वर्षात प्रदर्शित होणार असून त्याचे आत्ताच ओटीटी स्ट्रिमिंग राईट्स विक्री करण्यात आले असल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

OTT Rights For Pushpa 2 The Rule

अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. पुष्पाचा पहिला भाग २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर, परदेशातही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती.

एप्रिल महिन्यामध्ये अल्लू अर्जुनचा चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित झाला होता. त्याच्या लुकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. चित्रपट आगामी वर्षात प्रदर्शित होणार असून त्याचे आत्ताच ओटीटी स्ट्रिमिंग राईट्स विक्री करण्यात आले असल्याची चर्चा होत आहे.

चित्रपट प्रदर्शनासाठी एक वर्ष शिल्लक असले तरी, आत्ताच चित्रपटाचे ओटीटी राईट्स रेकॉर्डब्रेक पैशांनी विकले आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ चे थिएट्रीकल स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्स (Netflix)ने घेतले. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाचे राईट्स कोट्यवधी रुपयांनी विकत घेतली आहे. याविषयीची माहिती ट्रेड ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडिया एक्स (ट्विटर)च्या माध्यमातून दिली आहे.

अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे कलाकार ‘पुष्पा २: द रुल’ प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ‘पुष्पा: द राईज’ मध्ये अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना या जोडीने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांना ही जोडी फारच भावली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींचा टप्पा गाठला होता. दरम्यान, ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट वैश्विक कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटाचा मान मिळवला.

‘पुष्पा २: द रुल’ पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकले आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटाची बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेटफ्लिक्सने ‘पुष्पा २: द रुल’ सोबतच ‘सालार’चे ओटीटी राइट्सही विकत घेतले आहेत. तर ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सने ओटीटी स्ट्रिमिंग राइट्स कितीला विकले आहेत? अद्याप ही माहिती गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT