Pushpa 2 Allu Arjun  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २'च्या प्रेक्षकांमध्ये ७० टक्क्याने वाढ; नेटकरी म्हणाले पीआर स्टंट...

Pushpa 2 : संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला पीआर स्टंट म्हटले. आता पुष्पा २ चा बॉक्स ऑफिस कलेक्शन बघून खात्री झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pushpa 2 : पुष्पा फेम तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला गेल्या शुक्रवारी, १३ डिसेंबर रोजी, ज्युबिली हिल्समधील त्याच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. पुष्पा २: द रुल'च्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे अल्लू अर्जुनला ताब्यात घेण्यात आले होते. अल्लू अर्जुनला या प्रकरणात एका दिवसात जामीन मिळाला होता. बरं, या सगळ्या प्रकरणामुळे अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा २च्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच परिणाम झाला आहे.

माहितीनुसार, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २' चित्रपटाच्या विक्रीत देशांतर्गत ७४% वाढ झाली आणि गेल्या आठवड्याच्या शेवटी जगभरात ७०% वाढ झाली. परिणामी, पुष्पा २ या तेलुगू अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाने १२०० कोटी रुपयांचा टप्पा सहजतेने ओलांडला. इंटरनेटवर हा अहवाल आल्यानंतर लगेचच, अनेक नेटकऱ्यांनी अल्लू अर्जुनच्या पुनरागमनाचा आनंद साजरा केला. परंतु, असे अनेक नेटकरी आहेत ज्यांना अल्लू अर्जुनाची अटक ही केवळ एक प्रसिद्धी स्टंट आहे हे या टक्केवारीवर स्पष्ट झाल्याचे विधान केले.

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २' चित्रपटाच्या विक्रीत वाढ झाल्याचे वृत्त देणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टखाली एका नेटिझनने दावा केला आहे की, "इसलिये तो ये सब नाटक हुवा था अंदाजा १००% सेल बधाने का था," तर दुसऱ्या चाहत्याने विचारले, "कही ये अरेस्ट वाला सीन स्क्रिप्टेड तो नहीं ना." दुसऱ्या एका नेटकरी म्हणाला, “जेव्हा तो अटक होत असताना हसत होता, तेव्हा मला माहित होते की हा एक पीआर स्टंट आहे!” बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचा संदर्भ देत, चित्रपटप्रेमींनी शेअर केले, “भाऊ तो ​​जेल जाके संजय दत्त बन गया,” तर दुसऱ्याने लिहिले, “मिशन जेल सक्सेसफुल”

दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा २ हा वर्षातील बहूप्रतीक्षित सिक्वेलपैकी एक होता. कारण २०२१ साली आलेल्या पुष्पा: द राइज नंतर चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT