Allu Arjun and Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

अल्लू अर्जुनने केलं 'जवान'चं कौतुक; शाहरूख खाननेही दिला फायर रिप्लाय

Pooja Dange

शाहरूख खानचा 'जवान' चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. काहीच दिवसात या चित्रपटाने कोट्यवधींचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडला आहे.

पुष्पा स्टार अल्लू अर्जुनने देखील या 'जवान'चे कौतुक केले आहे. त्यानंतर शाहरूख खानाने त्याच्या अंदाजात अल्लू अर्जुनाचे आभार देखील मानले आहेत.

अल्लू अर्जुनने 'जवान' चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे. तसेच एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत तिच्यापाताविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अल्लू अर्जुनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'जवानच्या ग्रँड यासाठी त्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. शाहरूख खान गुरु हे तुमची सगळ्यात बेस्ट भूमिका होती. तुम्ही तुमच्या स्वॅगने सगळ्यांचे मने जिंकली आहेत, खर्च तुमच्यासाठी खूप खुश आहे सर, आमच्या प्रार्थना तुमच्या कमी आल्या.'

तसेच अल्लू अर्जुन जावं चित्रपटातील विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, डायरेक्ट अॅटली आणि संगीतकार अनिरुद्ध यांचे देखील कौतुक केले आहे.

अल्लू अर्जुनने 'जवान' चित्रपट कौतुक करणारी पोस्ट केल्यानंतर शाहरूख लगेच रिप्ल्य दिला आहे. अल्लू अर्जुनला उत्तर देत शाहरूख खानने लिहिले आहे की, 'तुझ्या प्रेमासाठी आणि प्रार्थनेसाठी खप आभार. राहिला प्रश्न स्वॅगचा तर जो व्यक्ती स्वतः फायर आहे आणि माझे कौतुक करत आहे. तुझा कौतुकामुळे माझा उरलेला दिवस चांगला जाईल.

मला पुन्हा जवान झाल्यासारखं वाटतंय!!! मी कबूल करतो की मी तुझ्याकडून काहीतरी शिकले असेन कारण मी पुष्पा चित्रपट तीन दिवसांत तीनदा पाहिले होता !!! तुला मिठी मारायची आहे. शक्य तितक्या लवकर तुला येऊन भेटेन. स्वॅगमध्ये रहा!!! तुला खुप प्रेम.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SCROLL FOR NEXT