Alia Bhatt was spotted with the team of 'Darlings' where she was seen flaunting her baby bump Saam Tv
मनोरंजन बातम्या

आलिया भट्टने मिनी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केले बेबी बंप, तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो बघून चाहते झाले खुश

आलिया भट्ट 'डार्लिंग्स' या चित्रपटाच्या टीमसोबत दिसली होती, जिथे ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो देखील दिसत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) सध्या खूप आनंदात आहे. रणबीर कपूरसोबत(Ranbir Kapoor) लग्न केल्यानंतर दोन महिन्यांनी तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलियाच्या प्रेग्नेंसीने सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला होता. आलिया स्वतःची आणि बाळाची पूर्ण काळजी घेत आहे, पण त्याचवेळी ती तिच्या करिअरवरही पूर्ण लक्ष केंद्रित करते. तिचा हॉलिवूड डेब्यू चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ती सध्या 'डार्लिंग्स' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

आलिया भट्ट ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अलीकडेच, आलिया भट्ट 'डार्लिंग्स' या चित्रपटाच्या टीमसोबत दिसली होती, जिथे ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो देखील दिसत होता.

आलियाच्या फोटोंचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. अलीकडेच, ती तिच्या 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिसली होती, जिथे ती एक क्यूट मिनी ड्रेस परिधान करून आली होती. या प्रमोशनदरम्यानचे अनेक फोटो समोर आले आहेत, जे आता इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत.

आलियाने फ्लॉन्ट केले बेबी बंप

पेस्ले-प्रिंट मिनी ड्रेसमध्ये आलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. आलियाच्या लाइट मेकअप, मोकळ्या केसांनी तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. या फोटोंमध्ये आलिया 'डार्लिंग्स' टीमसोबत पोज देताना दिसत होती. हे फोटो पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत.

आलिया 'डार्लिंग्स' चित्रपटातून करणार नवीन सुरुवात

'डार्लिंग्स' या चित्रपटाद्वारे आलिया निर्माता म्हणून तिचा नवीन प्रवास सुरू करत आहे. 'डार्लिंग्स' नेटफ्लिक्सवर ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. 'डार्लिंग्स' हा डार्क कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. मुंबईत आपली जागा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आई-मुलीचे जीवन या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT