Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

VIDEO: आलियासोबत 'बेबीमून' एन्जॉय करतोय रणबीर कपूर, व्हिडीओ केला शेअर

बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या बेबीमून एन्जॉय करत आहेत.

साम वृत्तसंथा

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध कपल अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या बेबीमून एन्जॉय करत आहेत. दोघेही इटलीमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत. आलियाने इटलीमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा पती रणबीर कपूरची झलक दिसत आहे. हा एक रील व्हिडीओ आहे, ज्यामध्ये रणबीर त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'देवा देवा' गाण्यावर स्विंग करताना दिसत आहे. रणबीर आणि आलिया गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. दोघेही बेबीमून व्हेकेशनला जात होते. परंतु त्यावेळी सुट्टीचे ठिकाण उघड करण्यात आले नव्हते.

पण नंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) इटलीमध्ये बेबीमून व्हेकेशनवर गेल्याचे समोर आले. आता आलियाने इटलीच्या सुंदर लोकेशनवर रील बनवून सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडिओची सुरुवात निळे आकाश आणि पांढरे ढग यांच्या सुंदर दृश्यांनी होते. यानंतर रणबीर भिंतीवर बसलेला दिसतो.रणबीर कपूरने बॅगी ब्लू शर्ट परिधान केले आहे,त्याचा लूक पूर्ण करण्यासाठी त्याने सनग्लासेस देखील घातले आहेत. विस्कटलेल्या केसांनी तो अजूनच हॉट दिसत आहे.

ही रील शेअर करताना आलिया भट्टने, 'द लाइट ऑफ माय लाइफ' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आलियाच्या या पोस्टवर रणबीरची बहीण म्हणजेच रिद्धिमा कपूर साहनी हिने हार्ट इमोजी कमेंट केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील आलिया आणि रणबीरचे मित्र आणि चाहते देखील हार्ट आणि फायर इमोजी कमेंट करत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. आलियाने २७ जून रोजी गूड न्यूज दिली होती. यानंतर रणबीरनेही बाबा होण्याची उत्सुकता व्यक्त केली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुनसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT