Jigra movie poster INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Jigra Movie Poster Release : ''कहानी बहुत लंबी है, और भाई के पास वक्त बहुत कम''; आलियाने शेअर केले 'जिगरा'चे पोस्टर

Alia Bhatt Shared Upcoming Movie Poster : अभिनेत्री आलिया भट हिने तिच्या सोशल मिडियावरून आगामी 'जिगरा' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Saam Tv

अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आगामी 'जिगरा' या चित्रपटाचे पोस्टर गुरुवारी शेअर केले असून ११ ऑक्टोबरला हा चित्रपट सिनेमगृहात येणार असल्याचे सांगितले आहे. आलिया एक वर्षापासून बोलीवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसलेली नव्हती. त्यामुळे तिच्या फॅन्सला आता तिच्या या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून हा अॅक्शन मुव्ही असल्याचे समजत आहे. या पोस्टरमध्ये आलिया पाठमोरी उलटलेल्या गाडीवर उभी आहे. तिच्या पाठीवर बॅग आहे, आणि आजूबाजूला लागलेल्या आगीत समोर अभिनेता वेदांग रैना दिसतोय. आलियाने हे पोस्टर पोस्ट करताना, ''तू मेरे प्रोटेक्शन में है.'' असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, ही पोस्टर शेअर केल्यावर काही वेळातच आलियाने जिगराचे अजून एक पोस्टर पोस्ट केले. हे पोस्टर शेअर करताना तिने, ''कहानी बहुत लंबी है, और भाई के पास वक्त बहुत कम,'' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टरमध्ये आलिया एकटीच दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर अतिशय गंभीर भाव आहेत. यातही आलियाच्या हातात हातोडा असून, तिच्या मागे जाळीचे कुंपण आहे, आणि आजूबाजूला आग लागली आहे.

आलियाने शेअर केलेल्या दोन्ही पोस्टरवरून हा भाऊ - बहिणीच्या नात्याचा चित्रपट असल्याचे समजले आहे. तसेच या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन असणार आहे, आणि आलिया भट लाडक्या भावाचं रक्षण करणार आहे. वेदांग रैना तिच्या भावाची भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटचं दिग्दर्शन वासन बाला करणार असून, आलियाने करण जोहरसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आलियाने 'स्टुडेंट ऑफ द इयर' मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'कपूर अँड सन्स', 'बद्री की दुल्हनिया', 'हायवे', 'राझी'सारख्या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. तिच्या 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. मुलगी राहाच्या जन्मानंतर तिने काही काळासाठी सिनेमातून ब्रेक घेतला होता. 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या तिच्या चित्रपटानंतर आता एक वर्षाने ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT