Alia-Ranbir SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia-Ranbir : रणबीर-आलियाच्या लग्जरी बंगल्याची पहिली झलक, राहाच्या नवीन घराची किंमत किती? पाहा VIDEO

Alia-Ranbir New Bungalow : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या नवीन घराची पहिली झलक समोर आली आहे. त्यांचा हा आलिशान बंगला किती कोटींचा जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आलिया भट्टचं (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बॉलिवूडचे पावर कपल आहे. हे दोघे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि रणबीर त्यांच्या नवीन घराच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र त्यांचे आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आलिया आणि रणबीरच्या नवीन घराची झलक पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. हा आलिशान बंगला बांद्रा येथे आहे. बंगल्याच्या कामाची पाहाणी करण्यासाठी कायम आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बंगल्यावर येत होते. अनेकदा ते स्पॉट झाले.

बंगल्याची किंमत काय?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बंगल्याचे नाव 'कृष्णा राज' (Krishna Raj ) असे आहे. हा आलिशान बंगला रणबीर आणि आलियाने खास त्यांची लाडाची लेक राहासाठी बनवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार,रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या या नवीन कोऱ्या आलिशान घराची किंमत तब्बल 250 कोटी रुपये आहे. अखेर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे आलिशान घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

रणबीर-आलियाच्या आलिशान घराचे नाव रणबीर कपूरची दिवंगत आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. रणबीर-आलियाचा हा आलिशान बंगला चार मजली आहे. बंगल्याच्या बाल्कनीमध्ये छान हिरवळ पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर , आलिया भट्ट आणि त्यांची लेक राहा आता लवकरच या आलिशान बंगल्यात शिफ्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT