Jigra OTT Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jigra OTT Release: आलियाचा 'जिगरा' आता OTT वर, घरबसल्या पाहा लाडक्या भावासाठी लढणाऱ्या बहिणीची कथा

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) नुकताच नवीन 'जिगरा' (Jigra ) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'जिगरा' चित्रपट 11 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 25.35 कोटी रुपये कमावले आहे.

'जिगरा' चित्रपटातील आलियाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपटात आपल्या भावासाठी एका बहिणीचा संघर्ष दाखवला आहे. आता चाहते 'जिगरा'च्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. 'जिगरा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटात आलियाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'जिगरा'चे स्ट्रीमिंग अधिकार नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. जिगरा' हा चित्रपट नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला नेटफ्लिक्स या ओटीटी (OTT Release) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक यासाठी खूप उत्सुक आहेत.

'जिगरा' या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन यांनी मिळून केली आहे. 'जिगरा' चित्रपटात आलियाने सत्याची भूमिका साकारली आहे. तर वेदांग रैनाने अंकुरची भूमिका साकारली आहे. हे दोघे भाऊ-बहिण आहेत. 'जिगरा' या चित्रपटात अॅक्शन आणि थ्रिलर भरपूर पाहायला मिळत आहे. आलिया या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या भावाला जेलमधून सोडवण्यासाठी ती प्रयत्न करताना चित्रपटात पाहायल मिळत आहे.

आलिया भट्ट नेहमीच आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असेत. आता प्रेक्षकांना आलिया भट्टच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA Latest News : ठाकरे गट आणि कॉंग्रेसचे स्वबळाचे वारे, महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर ?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीत शरद पवारांची मध्यस्थीची भूमिका

Nandurbar Rain : परतीच्या पावसाने शेतात ३ फुटांपर्यंत पाणी; पांढर सोनं झालं मातीमोल!

भारतात एकूण किती रेल्वे स्टेशन्स आहेत? पाहा एका क्लिकवर

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम! Mechathlon 2024 मुंबई एडिशनमध्ये रोबोटिक्सचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT