Alia Bhatt Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt: आलिया भटने लाँच केला मॅटर्निटी वेअर ब्रँड, तणावमुक्त राहण्यासाठी तयार केले बंप-फ्रेंडली कपडे

आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आलिया भट (Alia Bhatt)तिच्या अभिनयामुळे आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. आलियाने २०२० मध्ये लहान मुलांचा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता. आता आलिया मॅटर्निटी कपड्यांचा ब्रँड लाँच करणार आहे. आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आलियाला तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी कलाकारांनीही यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आलियाने पोस्ट मध्ये लिहिले आहे की, "जेव्हा मी लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता तेव्हा लोकांनी मला प्रश्न केला होता की मुलं नसतानाही मी लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड का लाँच करत आहे? परंतु आता मी मॅटर्निटी वेअर लाँच करताना कोणी मला याचे कारण विचारेल असे मला वाटत नाही, तरीही मी लोकांना सांगू इच्छिते."

तसेच पुढे आलिया बोलते, "मला कधीही मॅटर्निटी वेअर विकत घेतले नव्हते, परंतु या परिस्थितून जाताना मला बराच त्रास होत आहे. गरोदरपणात तुम्हला माहित नसते की तुम्ही येणाऱ्या महिन्यात कशा दिसणार आहेत किंवा तुम्ही काय अनुभवणार आहात आणि अशा वेळी योग्य कपडे न मिळणे सुद्धा तणावयुक्त असू शकते. या परिस्थितीत तुम्ही विचार करता की काय घालू, काय विकत घेऊ? आपल्या नेहमीच्या कपड्यांचा ब्रँडची मोठी साईझ घेऊया की दुसऱ्या ब्रँडचे कपडे घेऊया."

ती पुढे म्हणाली, "मी अनेकवेळा पती रणबीर कपूरचे कपडे घालण्याचा विचार केला, मग मला वाटले की याची गरज नाही. माझे शरीर बदलत आहे तर त्याची स्टाईल पण बदलूया. मी गरोदरपणात माझी स्टाईल बदलली नाही. मी माझ्याकडे असलेल्या कपड्यांमध्ये थोडे बदल करून त्यांना मी बंप- फ्रेंडली स्टायलिश बनवले आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT