Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्टने दिली गुड न्यूज; रणबीरला दिलं मोठं बर्थडे गिफ्ट

आलिया भट्टने तिच्या चाहत्यांसाठी आंनदाची बातमी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडची 'पटाखा गर्ल' म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या आंनदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री सध्या तिच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे. २०२२ वर्ष आलियासाठी खूपच स्पेशल ठरतंय. आलिया भट्ट केवळ वैयक्तिक नाही, तर प्रोफेशनल लाइफमध्येही आघाडीवर आहे. आलियाने नुकतीच याबाबतची माहिती सोशल मीडियावर (Social Media)दिली आहे.

आलिया भट्टने तिच्या चाहत्यांसाठी आंनदाची बातमी दिली आहे. आलियाची "द टाईम 100 इम्पॅक्ट" अवॉर्ड साठी निवड झाली आहे. आलियाने याबाबतचे तिचं सन्मानपत्र इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे.

आलिया भट्टचा पती रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. दरम्यान आलियाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बॉलिवूडमध्ये एकेक सुपरहिट चित्रपट मिळवून आलियाने हे यश प्राप्त केले आहे. 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर', 'डार्लिंग्स'नंतर 'ब्रह्मास्त्र'मधील उत्कृष्ट अभिनयानंतर आलियाची गणना बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जात आहे.

दमदार अभिनयाने आलियाने बॉलिवूड इडंस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे. आलियाने २०१२ मध्ये दिग्दर्शक करण जोहरच्या "स्टुंडट ऑफ द इयर" या चित्रपटातून बाॉलिवूड डेब्यू केले आहे. यानंतर 'हायवे', 'हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया', '२ स्टेटस', 'राझी', 'डिएर जिंदगी', 'कलंक', 'गलीबॉय', 'बद्रिनाथ की दुल्हनिया', 'सडक-२', 'उडता पंजाब' यासारखे हिट चित्रपट केले. आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटातून हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेत्री आलिया भट्टला "द टाइम 100 इम्पॅक्ट" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. 'आलिया भट्टने तिच्या दमदार अभिनयामुळे आधुनिक स्त्रीची प्रतिभांवत प्रतिमा प्राप्त केली आहे, असे त्यात म्हटलं आहे. आलियाच्या या यशाबद्दल आई अभिनेत्री सोनी राजदानच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिया मिर्झासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आलियाचे अभिनंदन करत आहेत.

मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, आई सोनी राजदान यांनी देखील कमेंट केली आहे. सेलिब्रिटींसह अनेक चाहते आलियावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. माहितीनुसार, आलिया भट्टला २ ऑक्टोबर रोजी सिंगापूर येथे "द टाइम 100 इम्पॅक्ट" अवॉर्ड दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT