Alia Bhatt New House Instagram
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt New Home: बहिण असावी तर अशी...! बहिणीला दोन नवी घरं गिफ्ट केल्यानंतर आलियाने स्वत:साठी घेतलं नवं घर

Alia Bhatt Buys Apartment: एप्रिल महिन्यात आलियाने बहीण शाहीन भट्टला कोट्यवधी रुपयांचे दोन फ्लॅट भेट म्हणून दिले असून नुकतेच आलियाने आणखी एक नवीन घर घेतल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Alia Bhatt New House: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिची सर्व कमाई घर खरेदीसाठी खर्च करत असल्याचे दिसते. याच महिन्यात आलियाने बहीण शाहीन भट्टला कोट्यवधी रुपयांचे दोन फ्लॅट भेट म्हणून दिले असून आता मिळालेल्या माहितीनुसार, तिने वांद्रे पश्चिम येथे आणखी एक नवीन घर घेतल्याची माहिती मिळत आहे. वांद्रामध्ये आलियाने खरेदी केलेल्या घराची किंमत जवळपास ३७ कोटी रुपये आहे. आलियाचे नवीन घरही 'कृष्णराज बंगला'मध्ये बनवले जात आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार आणि IndexTap.com या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्टच्या कंपनीने खरेदी केलेले घर 2 हजार 497 स्क्वेअर फूटमध्ये तिचे नवे घर आहे. आलियाने एरियल व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये तिचं नवं घर खरेदी केले आहे. ही निवासी मालमत्ता गोल्ड स्ट्रीट मर्कंटाइल कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आली होती. १० एप्रिल २०२३ रोजी तिच्या नव्या घराचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं असून २.२६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. (Bollywood Actress)

आलियाने बक्षीस प्रमाणपत्राद्वारे तिची बहीण शाहीन भट्टला दोन घरे गिफ्ट केल्याचेही समोर आले आहे. Zapkey.com या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटची किंमत ७.६८ कोटी रुपये आहे, ते नवे घर गीगी अपार्टमेंट्स, एबी नायर रोड, जुहू, मुंबई येथे आहे. पहिले घर १ हजार १९७ स्क्वेअर फूट तर दुसरे घर ८८९.७५ स्क्वेअर फूट इतकं नवं घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने मुद्रांक शुल्कासाठी ३० लाख ७५ हजार रुपयांचा व्यवहार केला. अद्याप आलियाने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. (Bollywood Film)

आलिया सध्या पती रणबीर कपूर आणि मुलगी राहासोबत वांद्रामधील पाली हिल येथे 'वास्तू'मध्ये राहते. वांद्रामधील या घरातच बॉलिवूडच्या क्यूट कपलने सात फेरे घेत लग्नबंधनात अडकले होते. दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अनेकदा त्यांच्या नव्या घराचे जिथे काम सुरू आहे, तेथे व्हिजीट देत असतात. त्या ठिकाणी आलियाचं ८ मजली स्वप्नातील घर बांधले जात आहे. दोघेही लवकरच या नव्या अलिशान स्वप्नातील घरात शिफ्ट होणार आहेत. (Entertainment News)

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, आलिया लवकरच हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रित डेब्यू करणार असून तिच्या'हार्ट ऑफ स्टोन' असे चित्रपटाचे नाव आहे. सोबतच येत्या २८ जुलैला रणवीर सिंगसोबतचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय 'जी ले जरा' या चित्रपटाच्या शूटिंगलाही लवकरच सुरूवात करणार असून आलियासोबत प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT