Jigri Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Jigri Announcement: ‘रॉकी और रानी...’ नंतर आलियाची नवा चित्रपट, ‘जिगरी’मध्ये साकारणार महत्वाची जबाबदारी

Alia Bhatt New Movie Announcement: कायमच सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या आलियाचा लवकरच आणखी एक नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय.

Chetan Bodke

Jigri Announcement

सध्या आलिया भट्टची (Alia Bhatt) सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. (Social Media) लवकरच आलिया एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करियरच्या शिखरावर असलेल्या आलियाने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘राझी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. (Bollywood Film) कायमच सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या आलियाचा लवकरत आणखी एक नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जिगरा’ असं आहे. (Jigra Film)

करण जोहरने नुकताच आलिया भट्ट आणि वासना बाला यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. करणने सोशल मीडियावर पोस्ट करुन नव्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सांगितले, ‘आलियाचा वासना बालसोबत आगामी चित्रपट येतोय. चित्रपटाचे नाव, ‘जिगरा’ असं आहे. आणि त्याचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करीत आहे.’ शेअर केलेल्या फर्स्ट लूकने सर्वांचेच लक्ष चित्रपटाकडे वेधले आहे.

शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, प्रोमोच्या सुरुवातीला एक कोट दिसतोय. तो कोट, “धैर्याचा विरोधाभास असा आहे की, ते टिकवून ठेवण्यासाठी एखाद्याने जीवनाबद्दल थोडेसे निष्काळजी असणे आवश्यक आहे.” असा आहे. त्यानंतर पुढे आलियाच ॲनिमेटेड लूकमध्ये दिसून येत आहे. ती यामध्ये खांद्यावर बॅग घेत एकटी उभी दिसत आहे. पण या चित्रपटात आलिया फक्त अभिनेत्रीच म्हणून नाही तर, ती निर्माती म्हणून सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्रीचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना भावला.

पोस्ट शेअर करताना दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर म्हणतात, “वसन बाला दिग्दर्शित या अपवादात्मक कथेवर पुन्हा एकदा…my #Jigra, आलिया भटचे पुनरागमन. अतूट प्रेम आणि अतुलनीय धैर्याची कहाणी! जिगरा- 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे..” सध्या चित्रपटाची स्टार कास्ट गुलदस्त्यात आहे. चित्रपटाची निर्मिती, करण जोहर, अपूर्व मेहता, आलिया भट्ट आणि सोमेन मिश्रा आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन वासना बालाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

Anshula Kapoor Engaged: कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार! अंशुला कपूरच ठरलं; बॉयफ्रेंडनं 'या' ठिकाणी केलं प्रपोज

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT