Alia Ranbir Viral News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia-Ranbeer: असाच नवरा हवा गं बाई, रणबीर-आलियाच्या व्हिडीओने प्रेषकांचे मन पुन्हा जिंकले

व्हायरल झालेल्या व्हिडीओत रणबीर, आलिया आपल्या नव्या घराचे निरिक्षण करताना दिसत असून इंटीरियरसोबत नव्या घरासंबंधीत काही चर्चा करतानाही दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आपल्या चाहत्यांना 'गुडन्युज' देणार आहेत. आपल्या बाळाचे आगमन करण्यासाठी त्यांच्या नव्या घराची सजावटीची तयारी जोरात चालू आहे. सध्या त्यांच्या नव्या घराच्या साइटवरील त्यांचे काही फोटोज् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्या व्हिडीओत रणबीर, आलिया आपल्या नव्या घराचे निरिक्षण करताना दिसत आहेत सोबतच घरासंबंधीत इंटीरियरसोबत घरासंबंधीत काही चर्चा करतानाही दिसत आहेत.

व्हिडीओत आलिया भट्ट गुलाबी आणि काळ्या रंगाच्या शर्ट आणि पँट अशा साध्या लूकमध्ये ती दिसत आहे. तिच्या प्रेग्नेंसीकाळातील साध्या आणि सिंपल लूक आणि 'नो मेकअप'मध्ये ही ती चर्चेत आहे. सोबतच रणबीरही साध्या लूकमध्ये दिसत आहे. त्याने यावेळी पांढऱ्या टी-शर्टसोबतच निळी जीन्स आणि निळी कॅप घातलेली दिसत आहे. याव्हायरल व्हिडीओत चाहत्यांनी चांगलाच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या व्हिडीओत, आलिया आणि रणवीर अनेकदा नव्या घराच्या बांधकाम साईटवर बऱ्याचदा दिसतात. यावेळीही ते असेच दिसले होते. आपल्या घराच्या इंटीरियर डिझायनरशी घरासंबंधीत गप्पा मारताना दिसत होते. आलिया भट्ट पुढे येऊन बाल्कनीत फक्त खाली बघत होती. पण विशेष म्हणजे आलिया किंचितशी पुढे येताच रणबीरने काळजीपोटी आपल्या पत्नीचा हात पकडला. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यातील काही कमेंट करत रिअल हिरो म्हटले. तर आलियाला प्रोटेक्टिव्ह असेही बोलले. सर्वांनाच आवडेल अशी कमेंट म्हणजे, इतर कलाकारांसारखा फक्त कॅमेऱ्यासमोर बायकोचा हात पकडून चालणारा हिरो नसून खरोखरच त्याला पत्नीची काळजी आहे. ही जोडी नुकतीच 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात एकत्र दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

SCROLL FOR NEXT