Alia Bhatt And Ranbir Kapoor News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Ranbir Kapoor: आलिया-रणबीरच्या चिमुकलीची पहिली झलक, व्हिडिओ होतोय व्हायरल

हॉस्पिटलमधून मुलीला घरी घेऊन जातानाच आलिया आणि रणबीर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Alia-Ranbir Viral Video: बॉलिवूडची लाडकी जोडी आलिया आणि रणबीर यांचे एप्रिलमध्ये लग्न झाले. या जोडप्याला ६ नोव्हेंबर, २०२२ला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आलिया आणि रणबीर त्यांच्या मुलीला आज घरी घेऊन गेले. हॉस्पिटलमधून मुलीला घरी घेऊन जातानाच आलिया आणि रणबीर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आलिया आणि रणबीर आज सकाळी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले. मीडियापासून रणबीर त्यांच्या मुलीचा चेहरा लपवत असल्याने व्हिडिओमध्ये दिसत आहे. पापाराझी आणि रस्त्यावर असलेल्या चाहत्यांनी आलिया भट्टच्या बाळाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. हे लोक बाळाला पाहण्यासाठी गाडीच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करीत होते.

रणबीर आलियाच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी छायाचित्रकार त्यांच्या कारच्या मागे धावत होते. या सगळ्यात रणबीरने मुलीचा चेहरा दिसणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली होती. या व्हिडिओमध्ये आलिया आणि रणबीर देखील दिसत आहेत. आलियाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच ब्लॅक रेंग रोव्हरमधून तिघेही घरी येत आहेत.

मुलगी झाल्यानंतर आलियाने तिच्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली होती. आलियाने तीन सिहांचे चित्र असलेली एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये आलियाने लिहिले होते: "आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी, आमच्या बाळाचा जन्म झाला आहे, आणि ती किती माजिकल मुलगी आहे"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, तर या ५ राशींना मिळेल आर्थिक लाभ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणेशोत्सवात पुण्यात ट्रॅफिकचा मोठा बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यासह 'या' मार्गांवर वाहतूक बंद

Maharashtra News Live Update: सांगली भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक खेळणी गौराईचं घरोघरी आगमन..

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT